शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तळोजा कारागृहात टेलीमेडिसिन

By admin | Updated: July 8, 2017 06:06 IST

तळोजा कारागृहातील कैद्यांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालय, अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल सारख्या ठिकाणी जाण्याची गरज आता

वैभव गायकर/ लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : तळोजा कारागृहातील कैद्यांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालय, अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल सारख्या ठिकाणी जाण्याची गरज आता भासणार नाही. कारागृहातील कैद्यांवर आता टेलीमेडिसिनद्वारे उपचार करण्यात येत असल्यामुळे कारागृहातील पोलिसांवर ताण कमी झालेला आहे. तळोजा कारागृहात एकूण २३०० कैदी आहेत. विशेष म्हणजे, कैद्यांना उपचारासाठी घेऊन जाताना अनेक कैदी पसार होण्याच्या घटनांना या नवीन तंत्रज्ञानामुळे लगाम बसणार आहे.तळोजा कारागृह हे महाराष्ट्र शासनाने स्वातत्र्यानंतर स्वत: बांधलेले राज्यातील पहिले कारागृह आहे. या कारागृहात कुविख्यात आरोपी, गँगस्टर आदी शिक्षा भोगत आहेत. यामध्ये मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आबू सालेम, छोटा राजन टोळीचे हस्तक आदींसह नायजेरियन कैदी मोठ्या प्रमाणात आहेत. कैद्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २ वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी आहेत. कैद्यांना गंभीर आजार उद्भवल्यास त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रु ग्णालयात घेऊन जावे लागत असे, एका आरोपीला घेऊन जाताना पोलीस अधिकारी, तीन-चार पोलीस कर्मचारी, वाहन असा वाढीव बंदोबस्त द्यावा लागतो. त्यात बॉम्बस्फोटातील कैदी अथवा गँगस्टर असल्यास ने-आण करण्यासाठी अतिरिक्त पोलीस बळ लागते. पोलिसांच्या वाहनांसाठी इंधनापोटी लाखो रुपयांचा खर्च लागतात. टेलीमेडिसिन सुविधेद्वारे या सर्व खर्चावर आळा बसणार आहे. कारागृहातील दररोज कमीत कमी ६ कैदी या सुविधेचा लाभ घेत आहेत. काय आहे टेलीमेडिसिन सुविधाटेलीमेडिसिन सुविधेमध्ये सर्वप्रथम कारागृहातील अधिकारी कैद्याच्या आजाराची माहिती ई-मेलद्वारे संबंधित रुग्णालयाला देतो. त्यानंतर डॉक्टर आणि कैद्यांचा थेट संवाद व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधला जातो. यामध्ये कैद्याशी डॉक्टर थेट संवाद साधून त्याच्या आजारपणाची विचारपूस करून त्याला योग्य ती औषध पुरविली जातात. यामुळे कैद्याच्या आजारावर योग्य ते निदान केले जाते. तळोजा कारागृहातून जे. जे. रुग्णालय व अलिबाग शासकीय रुग्णालयात ही सुविधा जोडल्याची माहिती कारागृहाचे मुख्य अधीक्षक सदानंद गायकवाड यांनी दिली.