शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक तीन महिने पगाराविना

By admin | Updated: September 3, 2015 23:34 IST

महापालिकेच्या शाळांमध्ये ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांना तीन महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. बहुतांश शिक्षक घर भाड्याने घेवून राहत आहेत

नवी मुंबई : महापालिकेच्या शाळांमध्ये ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांना तीन महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. बहुतांश शिक्षक घर भाड्याने घेवून राहत आहेत. पगारच नसल्याने अनेकांच्या घराचे भाडे थकले आहे. विनावेतन विद्यादानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना कर्ज घेवून घरखर्च भागवावा लागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे प्रशासनाने ठोक मानधनावर सव्वाशे शिक्षकांची नियुक्ती केली आहे. २०१० पासून हे शिक्षक विद्यादानाचे काम करत आहेत. पहिली तीन वर्षे ५ हजार रुपये मानधनावर काम केले. त्यानंतर मानधन ७ हजार रुपये करण्यात आले आहे. गतवर्षी शिक्षकांना १२ हजार रुपये मानधन देण्याचा ठराव महासभेने मंजूर केला आहे. मे महिन्यामध्ये सुटी असल्यामुळे ठोक मानधनावरील शिक्षकांना एक महिना वेतन देण्यात आले नव्हते. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षक पुन्हा कामावर रुजू झाले. तीन महिने झाल्यानंतरही अद्याप त्यांना पगार मिळालेला नाही. घरात सण साजरे करणे सोडाच परंतु ज्या घरात राहतो त्याचे भाडे देणेही शक्य नाही. एकीकडे घरमालक भाडे मागण्यासाठी तगादा लावत आहे. किराणा साहित्यही उधारीवर मागून आणावे लागत आहे. भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांची स्थिती शहरातील कंत्राटी कामगारांपेक्षाही वाईट झाली आहे. पालिकेला अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या या शिक्षकांना कायम सेवेत घेतले जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. ठोक मानधनावरील शिक्षकांची व्यथा कोणीही समजून घेत नाही. त्यांच्या वेतनामध्ये वाढ झाल्यामुळे सर्व्हिस टॅक्सचा विषय निर्माण झाला. त्याविषयी फाईलवर्क करण्यात वेळ गेल्यामुळे अद्याप वेतन देण्यात आले नसल्याचे सांगितले जात आहे. परंतु विनावेतन शिक्षक घर कसे चालवतील याचा विचार कोणीच केलेला नाही. शक्य तितक्या लवकर वेतन देण्यात यावे अशी मागणी शिक्षक करू लागले आहेत. शिक्षण अधिकारी दत्तात्रेय नांगरे यांच्याशी संपर्क साधला असता दोन ते तीन दिवसांमध्ये वेतन देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.