शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूतील फरार गुन्हेगार अटकेत

By admin | Updated: September 22, 2015 03:51 IST

तामिळनाडू येथून दोन वर्षांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला वाशीतून अटक करण्यात आली. डीएमके पक्षाच्या माजी मंत्र्याच्या

नवी मुंबई : तामिळनाडू येथून दोन वर्षांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला वाशीतून अटक करण्यात आली. डीएमके पक्षाच्या माजी मंत्र्याच्या स्विय्य साहाय्यकाच्या हत्येचा त्याच्यावर आरोप आहे. सन २०१३पासून तो तामिळनाडू पोलिसांना चकमा देत होता.तामिळनाडूच्या डीएमके पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री लालगुंडी यांचा स्विय्य साहाय्यक पोट्टू सुरेश याची ३१ जानेवारी २०१३ रोजी हत्या झाली आहे. डीएमके पक्षाचाच कार्यकर्ता पी पांडी उर्फ अटॅक पांडी याने त्याच्या हत्येची सुपारी दिल्याचे तपासात उघड झाले होते. यानुसार त्याच्यावर तामिळनाडूच्या मदुराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या हत्येमागे राजकीय कारण असल्याचीही शक्यता आहे. त्यामुळे मारेकरूंना अटक केल्यानंतर मुख्य सूत्रधार पांडीच्या शोधात तामिळनाडू पोलीस होते. परंतु दोन वर्षांपासून तो चकमा देत होता. अखेर नवी मुंबईत जुहूगाव येथे तो राहत असल्याची माहिती मदुराई पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपआयुक्तांसह मदुराई पोलिसांचे एक पथक वाशीत दाखल झाले होते. त्यांनी जुहूगाव परिसरातून पांडीला पकडण्याचाही प्रयत्न केला. परंतु गावठाणातील गल्लीबोळांमुळे त्यांना कारवाईत अडथळा आला. यामुळे सोमवारी सकाळी वाशी पोलिसांच्या मदतीने त्याला पकडले. वाशी सेक्टर ११ येथील बारलगत तो आला असता पोलिसांनी त्याला अटक केली. पांडी हा मदुराईचा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर १३हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. वाशी पोलिसांनी त्याला सीबीडी न्यायालयात हजर करून तामिळनाडू पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)