पनवेलमध्ये स्वाइन फ्लूने रु ग्ण दगावला

By Admin | Updated: July 7, 2017 06:45 IST2017-07-07T06:45:06+5:302017-07-07T06:45:06+5:30

पनवेलमध्ये स्वाइन फ्लूची साथ वाढत असून, तालुक्यात पहिला रु ग्ण दगावला आहे. कळंबोली येथील सनी शर्मा (२ वर्षे), असे त्याचे

Swine flu has lost Rs. In Panvel | पनवेलमध्ये स्वाइन फ्लूने रु ग्ण दगावला

पनवेलमध्ये स्वाइन फ्लूने रु ग्ण दगावला

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेलमध्ये स्वाइन फ्लूची साथ वाढत असून, तालुक्यात पहिला रु ग्ण दगावला आहे. कळंबोली येथील सनी शर्मा (२ वर्षे), असे त्याचे नाव असून त्याचा २८ जून रोजी मृत्यू झाला आहे. ताप व उलट्या होत असल्याने त्याला कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पनवेल तालुक्यात विविध ठिकाणी १०पेक्षा जास्त स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले असून, त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. ग्रामीण रुग्णालय व पनवेल पालिकेच्या वतीने एमजीएममध्ये स्वाइन फ्लू उपचाराकरिता २० खाटांच्या स्वतंत्र कक्षाची निर्मितीही करण्यात आली. सनी शर्माचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याची नोंद ३० जून रोजी एमजीएम रुग्णालयामार्फत ग्रामीण रुग्णालयाला दिली आहे.

Web Title: Swine flu has lost Rs. In Panvel