शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

तीन अधिकाऱ्यांना निलंबनाची नोटीस, नवी मुंबई आयुक्तांना जाग; प्रदूषण रोखण्यासाठी पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 10:32 IST

Navi Mumbai: नवी मुंबई शहरात प्रदूषणाच्या मानक कार्यप्रणालीतील नियमांचे उल्लंघन केले जात आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने फटकारताच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ऐरोली विभागात शुक्रवारी पाहणी करून प्रदूषणाच्या मानक कार्यप्रणालीतील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना बांधकाम थांबविण्याचे निर्देश दिले.

नवी मुंबई - शहरात प्रदूषणाच्या मानक कार्यप्रणालीतील नियमांचे उल्लंघन केले जात आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने फटकारताच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ऐरोली विभागात शुक्रवारी पाहणी करून प्रदूषणाच्या मानक कार्यप्रणालीतील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना बांधकाम थांबविण्याचे निर्देश दिले, तर संबंधित तीन अधिकाऱ्यांना निलंबित का करण्यात येऊ नये, याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ऐरोलीत इमारती बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषणाच्या मानक कार्यप्रणालीतील नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने हे बांधकाम थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. मानक कार्यप्रणालीतील बाबींची पूर्तता केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, अशी संबंधित विकासक मे. जलाराम एंटरप्रायजेस यांना नोटीस दिली आहे.

विशेष पथके पाहणी करणार
वायुप्रदूषण कमी करण्याच्या अनुषंगाने सुरू असलेले बांधकाम प्रकल्प, पायाभूत सुविधा कामांची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त १ आणि २ तसेच शहर अभियंता, सहायक संचालक नगररचना यांची पथके तयार केली आहेत. आयुक्त हे रस्ते, स्वच्छता, बांधकाम यांची पाहणी करणार आहेत.

यांना बजावल्या नोटिसा
विशेषत्वाने ऐरोली विभागामधील कामांमध्ये आढळलेल्या उणिवांच्या अनुषंगाने ऐरोली विभाग अधिकारी नैनेश बदले, कार्यकारी अभियंता संजय पाटील व उपअभियंता बंधू शिरोसे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित का करण्यात येऊ नये, याविषयी खुलासा मागितला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai Cracks Down on Pollution; Officials Face Suspension

Web Summary : Following High Court criticism, Navi Mumbai acts against pollution violations. Three officials face suspension notices. Teams will inspect construction for compliance, ensuring air quality and infrastructure projects adhere to regulations.