शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसी, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 04:59 IST

पहिल्या पतीच्या दोन वर्षांच्या मुलीसह प्रेयसी व प्रियकराने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पनवेलमधील समीर हॉटेलमध्ये शनिवारी घडला.

पनवेल : पहिल्या पतीच्या दोन वर्षांच्या मुलीसह प्रेयसी व प्रियकराने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पनवेलमधील समीर हॉटेलमध्ये शनिवारी घडला. यात दोन वर्षांची मुलीचा मृत्यू झाला असून प्रेयसी व प्रियकरावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.केरळ येथून रिजोश कुरियन हत्या करून त्याची पत्नी लिजी कुरियन व तिचा प्रियकर वाशीम कादिर हे तिच्या दोन वर्षांच्या जोहाना या मुलीसह समीर हॉटेलमध्ये आले होते. शनिवारी ते रूम सोडून जाणार होते. मात्र, दुपारचे १२ वाजून गेले तरी त्यांनी चेक आउट केले नाही. त्यामुळे हॉटेलच्या वेटरने त्यांचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आपल्याकडील दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. या वेळी तिघेही बेशुद्धावस्थेत आढळले. याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. तिघांनाही रुग्णालयात दाखल केले. यात जोहानाचा मृत्यू झाला असून, ते दोघे बेशुद्ध अवस्थेत आहेत. पोलीस उपायुक्त अशोक दुधे, वपोनि अजयकुमार लांडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केल्यावर घटनेतील दोघांनी एकाची हत्या केल्याचे समोर आले.लिजी आणि वाशीम हे मशरूम हार्ट फार्म संतापूर (केरळ) येथे एकत्र काम करत होते. दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याने त्यांनी मिळून लिजीचा पती रिजोशचा ३१ आॅक्टोबर २०१९ रोजी खून केला आहे. दोघांवर संतापूर पोलीसांत गुन्हा दाखल आहे. त्यामुळे ते तेथून पळून मुंबईत आले. त्यानंतर त्यांनी पनवेल गाठले. वाशीम याच्या भावाला संतापूर पोलिसांनी अटक केल्याचे समजल्याने लिजी व वाशीम यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोघांवरही मुंबईतल्या जेजे रुग्णालयात उपचार सुरू असून शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.