शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

साखरचौथ गणरायाचे आगमन

By admin | Updated: October 1, 2015 23:48 IST

भाद्रपद चतुर्थीला आगमन झालेल्या बाप्पांनी दहा दिवसांचा पाहुणचार घेवून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले होते. त्यानंतर आलेली संकष्ट चतुर्थी अर्थात साखरचौथीला पुन्हा भक्तांच्या आग्रहाखातर

पेण : भाद्रपद चतुर्थीला आगमन झालेल्या बाप्पांनी दहा दिवसांचा पाहुणचार घेवून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले होते. त्यानंतर आलेली संकष्ट चतुर्थी अर्थात साखरचौथीला पुन्हा भक्तांच्या आग्रहाखातर बाप्पा दीड दिवसाच्या अल्प कालखंडासाठी इच्छादर्शन व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आमंत्रण स्वीकारुन विराजमान झाले आहेत. गेले दशकभर या उत्सवाची लोकप्रियता वाढत असून पेणमध्ये शहर व ग्रामीण विभागात ८०० ते ८५० च्या घरात श्रींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे बाप्पाच्या मोहक मूर्ती व केलेली आरास पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळते. गुरु वारी रात्री सार्वजनिक मंडळाचे विविध सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांमुळे भक्तगण रात्रभर श्रीगणेशाच्या दर्शनासाठी रांगा लावतात. साखरचौथ गणरायांच्या उत्सवासाठी पेणच्या मूर्तिकारांना आपल्या कलाकुसरीची झलक दाखविण्याची अपूर्व संधी मिळते. पेणच्या गणेशमूर्तिकारांना साखरचौथ उत्सवानिमित्ताने कलाप्रदर्शनाचा अपूर्व योग जुळून येतो. पेणमधील कासार आळी गणेशमूर्तिकारांची गल्ली. या गल्लीत गणेशमूर्तिकारांची नवी पिढी सध्या या व्यवसायात नावलौकिक मिळवित आहे. येथील महाकाली मित्र मंडळाची गणेशमूर्ती या यंग जनरेशनमधील विजय गोडे, अनिकेत समेळ, मृगज कुंभार यांनी रंगसंगतीने साकारली असून गतवर्षी सुंदर मूर्तीच प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या या साखरचौथ मंडळाने यंदाही गणराज अ‍ॅवॉर्डसाठी अशीच सुंदर मूर्ती साकारली आहे. पेणमधील सार्वजनिक उत्सवामध्ये अष्टविनायक मित्रमंडळ, ओरिजन अष्टविनायक मित्रमंडळ, श्री दत्त मित्रमंडळ, प्रेमनगर मित्रमंडळ, विठ्ठल आळी मित्रमंडळ, कोळीवाडा मित्रमंडळ, समृद्धी रेस्टॉरंट यांच्यासह पेण फणस डोंगरी, पेण रामवाडी या शहरातील सार्वजनिक व घरगुती गणरायांसह जोहे-हमरापूर कलाग्राम परिसरात गणरायांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. (वार्ताहर)