शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2016 00:27 IST

न्यू इअर सेलीब्रेशन म्हटले की बेधुंद होऊ डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई हे चित्र डोळ््यासमोर उभे राहते; मात्र नवी मुंबई शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन

नवी मुंबई : न्यू इअर सेलीब्रेशन म्हटले की बेधुंद होऊ डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई हे चित्र डोळ््यासमोर उभे राहते; मात्र नवी मुंबई शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गुरुवारी वाशी उड्डाणपूल परिसरात ‘क्लीन-अप पार्टी’ स्वच्छता मोहीम राबविली. यामध्ये सहभागी ६० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दुपारी दोन ते पहाटे दोन वाजेपर्यंत वाशी उड्डाणपुलाचा चेहराच बदलून टाकला. या मोहिमेंतर्गत स्वयंसेवकांनी या मार्गावरील भिंतींवरही स्वच्छता, पर्यावरण संवर्धन तसेच वाहतुकीचे संदेश देणारे सूचना फलक रेखाटले. स्वच्छ शहराचा ध्यास घेतलेल्या या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी १२ तासांमध्ये संपूर्ण परिसराची साफसफाई करून त्याचे रूपच पालटून टाकले. महामार्गावरून जाणारे प्रवासी कसलाही विचार न करता या मार्गावर खाऊचे पॅकेट, प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या तसेच थंड पेयाच्या बाटल्या रस्त्यावर टाकतात, अशा नागरिकांना या स्वच्छता मोहिमेंतर्गत शहर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात आला. नवी मुंबई नेटवर्किंग या सामाजिक संस्थेचा या मोहिमेमध्ये सहभाग होता. या संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल १२ तास ही मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती. स्मार्ट शहराकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबई शहराला स्वच्छ शहराची ओळख कायम ठेवण्याकरिता प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे असून, तरुणांनी या कामात सहभागी होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई नेटवर्किंगचे अध्यक्ष संदीप शर्मा यांनी व्यक्त केली. नवी मुंबई महानगरपालिकेचे विभाग अधिकारी (सी विभाग) महेंद्रसिंग ठोके यांनीही या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता. नीलेश कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन संपूण परिसर स्वच्छ केला.