शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीमधील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:01 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट आवारामधील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट यापूर्वीच केले आहे. याशिवाय संपूर्ण फळ बाजारातील इमारतींचे आॅडिट करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट आवारामधील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट यापूर्वीच केले आहे. याशिवाय संपूर्ण फळ बाजारातील इमारतींचे आॅडिट करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली आहे.घाटकोपर येथे झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी भाजपाचे घणसोलीतील कार्यकर्ते कृष्णा पाटील यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर बाजार समितीने याविषयी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली आहे.बाजार समितीच्या कांदा - बटाटा मार्केटमधील ७ इमारती २०१३ मध्ये महापालिकेने धोकादायक घोषित केल्या आहेत. इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे.पुनर्बांधणीचा विषय उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याने प्रत्यक्ष पुनर्बांधणी करण्यात येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बाजार समितीने २०१३ मध्ये सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याची माहिती महापालिका प्रशासनाला दिली आहे.फळ मार्केटमधील मध्यवर्ती सुविधागृह, निर्यातदार इमारत व मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधागृहाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी निविदा मागविण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी कमी निविदा असलेल्या ग्लोबल इंजिनियरिंंग सर्व्हिसेस या कंपनीला स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठीचे कार्यादेश २८ जुलैला दिले असल्याची माहिती अधीक्षक अभियंता व्ही. बी. बिरादार यांनी दिली आहे.