शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

शेअर टॅक्सी चालकांचा धुमाकूळ

By admin | Updated: December 28, 2014 00:35 IST

माटुंगा रोड रेल्वे स्थानकापासून धारावी आणि अ‍ॅस्टीला बॅटरी या मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून अनधिकृत टॅक्सीचालकांनी धुमाकूळ घातला आहे.

मुंबई : माटुंगा रोड रेल्वे स्थानकापासून धारावी आणि अ‍ॅस्टीला बॅटरी या मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून अनधिकृत टॅक्सीचालकांनी धुमाकूळ घातला आहे. येथून सुटणाऱ्या अनधिकृत शेअर टॅक्सीचालकांकडून प्रवाशांची लूट सुरू असून महिला प्रवाशांची खुलेआम छेडछाड होत असल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. दादागिरी सुरू असलेल्या टॅक्सीचालकांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा स्थानिक पोलीस स्टेशनवर मोर्चा काढतील, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.माटुंगा रोड रेल्वे स्थानकापासून शेअर टॅक्सी सुरू आहेत. धारावी पोलीस स्टेशनपर्यंत प्रवाशांकडून प्रत्येकी १0 रुपये घेण्यात येतात. तर माटुंगा रोड ते माटुंगा लेबर कॅम्पपर्यंत एका प्रवाशाकडून सात ते दहा रुपये आकारण्यात येतात. एका टॅक्सीत सुमारे सहा ते सात प्रवाशांना कोंबण्यात येते. महिला आणि मुलींनाही गर्दीत दाटीवाटीने बसविण्यात येते. शेअर टॅक्सी थांब्यांवर महिला, मुलींची खुलेआम छेडछाड सुरू असते. मात्र, भीतीपोटी महिला कुजबुज न करता आपला मार्ग धरतात.शेअर टॅक्सी थांब्यामुळे सायन-धारावी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. २१ रुपयांचा मीटर होत असलेल्या ठिकाणासाठीही टॅक्सीचालकांकडून प्रत्येकी ७ ते १0 रुपये वसूल करण्यात येतात. एका टॅक्सीत सुमारे सहा प्रवाशांना बसविण्यात येत असल्याने टॅक्सीचालकाला सुमारे दुप्पट फायदा होतो. सायंकाळच्या सुमारास प्रवाशांची संख्या अधिक असल्याने माटुंगा रेल्वे स्टेशन येथे टॅक्सीचालकांची दादगिरी सुरू असते. एकट्या प्रवाशाला प्रवास करायचा असल्यास येथून टॅक्सी मिळविण्यासाठी दिव्य करावे लागते.रात्रीच्या वेळी टॅक्सीचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. त्यामुळे येथून सुटणाऱ्या शेअर टॅक्सीचालकांविरोधात प्रवाशांची तीव्र नाराजी आहे. दिवसा येथून जाण्यास बेस्ट बस पर्याय असला तरी ती एका तासानंतर येत असल्याने प्रवाशांना शेअर टॅक्सीवर विसंबून राहावे लागते.शेअर टॅक्सीचालकांकडून महिलांची छेडछाड सुरू असल्याने या टॅक्सींवर बंदी घालावी, अशी मागणी दक्षिण मध्य जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय भालेराव यांनी शाहूनगर पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शेअर टॅक्सीचालकांच्या दादागिरीबाबत प्रवाशांनी वारंवार वाहतूक पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. शेअर टॅक्सीचे भाव निर्धारित करावेत आणि महिलांची होणारी छेडछाड पोलिसांनी रोखावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. (प्रतिनिधी)शेअर टॅक्सी थांब्यामुळे सायन-धारावी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. २१ रुपयांचा मीटर होत असलेल्या ठिकाणासाठीही टॅक्सीचालकांकडून प्रत्येकी ७ ते १0 रुपये वसूल करण्यात येतात. रात्रीच्या वेळी टॅक्सीचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. त्यामुळे येथून सुटणाऱ्या शेअर टॅक्सीचालकांविरोधात प्रवाशांची तीव्र नाराजी आहे. दिवसा येथून जाण्यास बेस्ट बस पर्याय असला तरी ती एका तासानंतर येत असल्याने प्रवाशांना शेअर टॅक्सीवर विसंबून राहावे लागते.