शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

विशेष मुलांचा ७ हजार राख्यांचा संकल्प

By admin | Updated: July 6, 2017 06:26 IST

गतिमंद मुले ही त्यांच्या पालकांना काही वेळेस एक समस्या वाटते. परंतु याच मुलांना सुयोग्य प्रशिक्षण दिले तर हीच मुले अनन्यसाधारण

जयंत धुळप/ लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : गतिमंद मुले ही त्यांच्या पालकांना काही वेळेस एक समस्या वाटते. परंतु याच मुलांना सुयोग्य प्रशिक्षण दिले तर हीच मुले अनन्यसाधारण ठरू शकतात, हे पेण येथील आई डे केअर संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातून शिकून आज स्वत:च्या पायावर उभे राहाण्याकरिता सिद्ध झालेल्या मुलांकडे पाहिल्यावर दिसून येते. प्रशिक्षणांती ही मुले अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या राख्या तयार करतात. गेल्या वर्षी त्यांनी पाच हजार राख्या तयार केल्या होत्या. यंदा आतापर्यंत ४ हजार ५०० राख्या तयार केल्या असून एकूण ७ हजार राख्या तयार करण्याचा संकल्प केला आहे.आई डे केअरमधील मुलांचे कौतुक करुन त्यांना प्रोत्साहित करण्याकरिता विविध संस्थांनी या राख्या खरेदी करुन मोठे सहकार्य केले आहे. त्यातून मुलांचा आत्मविश्वास खऱ्या अर्थाने वृद्धिंगत झाला आहे. पेण नगरपालिकेच्या नऊ प्राथमिक शाळा, आनंदशाळा, कारमेल हायस्कूल, केईएस प्राथमिक व माध्यमिक शाळा, सुमतीबाई देव प्राथ. शाळा, गुरु कुल हायस्कूल, पतंगराव कदम कॉलेज, मदर तेरेसा शाळा, प्रायव्हेट हायस्कूल, भाऊसाहेब नेने कॉलेज, सौ.म.ना.नेने कन्या विद्यालय, ट्रीहाऊस स्कूल, युरोकिड्स स्कूल, नवजीवन शाळा या पेणमधील संस्थांबरोबरच पनवेल येथील ड्यू ड्रॉप्स स्कूल व आपटे येथील होली स्पिरिट स्कूल या शाळा राख्यांच्या ग्राहक आहेत. पेण एल.आय.सी.आॅफिस, पोस्ट आॅफिस, महावितरण आॅफिस, रोटरी क्लब आॅफ पेण, रोटरी क्लब आॅफ पेण ओरायन, रोटरॅक्ट क्लब, रोटरी क्लब आॅफ पेण हिरकणी, इनरव्हील क्लब आॅफ पेण, अहिल्या महिला मंडळ, जिंदाल स्टील वर्क्स, हायकल लि. पनवेल, उत्तम गॅल्व्हा, आरसीएफ आणि नवजीवन ग्लोबल हेल्थ सेंटर, ठाणे व बोरीवली या संस्थाही राखीच्या ग्राहक असल्याचे आई डे केअरच्याकार्यकारी संचालक स्वाती मोहिते यांनी सांगितले.सुयोग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यास गतिमंद मुले काम करू शकतात, हे वास्तव अनुभवण्याकरिता संस्थेला भेट देण्याचे आवाहन आई डे के अर या संस्थेच्या वतीने करण्यात आले.सुयोग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यास गतिमंद मुले काम करू शकतात, अर्थार्जन करू शकतात हे वास्तव अनुभवण्याकरिता संस्थेला भेट देवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याकरिता ‘आपल्या सहकार्याचा हात पुढे करा, तो आम्ही राखीच्या प्रेमाने बांधून ठेवू!’ अशी मानसिकता या सर्व मुलांची असल्याचे यावेळी बोलताना संस्थेच्या मोहिते यांनी सांगितले.