Crime News: नवी मुंबईतील श्रेयाचा लोणावळ्यातील दरीत मिळाला मृतदेह, मृत्यूचे कारण काय, पोलिसांनी काय सांगितले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:15 IST2026-02-03T13:12:45+5:302026-02-03T13:15:26+5:30

Lonavala Crime News: बेलापूरमधील २० वर्षीय तरुण श्रेया ही सोलो ट्रेकसाठी घरुन लोणावळ्याला गेली होती. पण, टायगर पॉईंटजवळी दरीत तिचा मृतदेह आढळून आला. 

Shreya's body was found in a valley in Lonavala in Navi Mumbai, what was the cause of death, what did the police say? | Crime News: नवी मुंबईतील श्रेयाचा लोणावळ्यातील दरीत मिळाला मृतदेह, मृत्यूचे कारण काय, पोलिसांनी काय सांगितले?

Crime News: नवी मुंबईतील श्रेयाचा लोणावळ्यातील दरीत मिळाला मृतदेह, मृत्यूचे कारण काय, पोलिसांनी काय सांगितले?

Lonavala Crime: विधी शाखेचे शिक्षण घेत असलेल्या एका २० वर्षीय तरुणीचा लोणावळ्यामधील खोल दरीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी रेस्क्यू पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला आणि तपास सुरू केला. प्राथमिक तपासातून श्रेयाने हत्या झाली नसून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामागील कारणही पोलिसांनी सांगितले आहे. 

नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील श्रेया नरेंद्र पती ही २० वर्षीय तरुणी कायद्याचे शिक्षण घेत होती. ती शनिवारी (३१ जानेवारी) लोणावळ्याला सोलो ट्रेकसाठी गेली होती. लोणावळ्यातील ड्यूक्स नोजपासून श्रेया रिक्षाने टायगर पॉईंटजवळ गेली होती. तेथीलच एका पानटपरीजवळ श्रेयाचा बॅग लोकांना मिळाली होती. त्यानंतर तिचा तपास सुरू झाला होता. 

श्वानाने नेले मृतदेहापर्यंत

बॅगेत ओळखपत्र, मोबाईल, लॅपटॉप होता. त्यावरून पोलिसांनी श्रेयाच्या आईवडिलांशी संपर्क केला. त्यानंतर बेपत्ता झाल्याची नोंद करत पोलिसांनी शोध सुरू केला. पुणे ग्रामीण पोलिसांनी दुर्गा या श्नानाची मदत घेतली. श्वान दरीत पडलेल्या श्रेयाच्या मृतदेहापर्यंत पोलिसांना घेऊन गेले. 

त्यानंतर पोलिसांनी शिवदुर्ग रेस्क्यू पथकाची मदत घेतली आणि तिचा मृतदेह बाहेर काढला. श्रेयासोबत घातपात झाल्याची किंवा तिचा अपघात झाल्याची संशय व्यक्त केला गेला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून मृत्युचे कारण समोर आले. 

श्रेयाने आत्महत्या का केली?

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात श्रेयाच्यासोबत घातपात झाला नसून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले. 

पोलिसांनी सांगितले की, श्रेया गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली होती. तिच्या कुटुंबात अंतर्गत वाद सुरू होते. त्याच वादामुळे तिची मनस्थिती ढासळली होती. मानसिक तणावातूनच ती नवी मुंबईतून लोणावळ्याला गेली आणि आत्महत्या केली. 

पोलिसांनी श्रेयाचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेतला आहे. दोन्ही डिव्हाईस लॉक आहेत. या डिव्हासमधील माहितीतून श्रेयाचा शेवटचा संवाद कुणासोबत झाला. आत्महत्या करण्यापूर्वी तिची मानसिक स्थिती याबद्दल अधिक माहिती मिळेल. तसेच कुटुंबातील वादाचा मुद्दाही कळेल, असेही पोलिसांनी सांगितले. 

Web Title : नवी मुंबई की युवती लोनावाला घाटी में मृत मिली; आत्महत्या का संदेह

Web Summary : नवी मुंबई की 20 वर्षीय विधि की छात्रा लोनावाला में मृत पाई गई। पुलिस को पारिवारिक मुद्दों और तनाव के कारण आत्महत्या का संदेह है। टाइगर पॉइंट के पास उसका बैग मिला, जिससे स्निफर डॉग की मदद से उसके शरीर की खोज हुई। जांच जारी है।

Web Title : Navi Mumbai Woman Found Dead in Lonavala Valley; Suicide Suspected

Web Summary : A 20-year-old law student from Navi Mumbai was found dead in Lonavala. Police suspect suicide due to family issues and stress. Her bag was discovered near Tiger Point, leading to the discovery of her body with the help of a sniffer dog. The investigation continues.