शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

शनीच्या देव्हाऱ्यात महिलांनाच बंदी का?

By admin | Updated: December 24, 2015 01:37 IST

पुण्यातील भूमाता रणरागिणी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी शनी शिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्याना रोखण्यात आले.

पुण्यातील भूमाता रणरागिणी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी शनी शिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्याना रोखण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा समानतेचा प्रश्न ऐरणीवर आला. याच पार्श्वभूमीवर महिलांना आपले मत व्यक्त करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे विचाराचे व्यासपीठ खुले करून दिले. यावेळी फक्त स्त्रियांनाच बंदी का, हा भेद कशासाठी, काही वैज्ञानिक कारणे आहेत का, असतील तर ती पटण्यासारखी आहेत का? असे अनेक सवाल त्यांनी प्रतिक्रियांमधून विचारले आहेत. काही महिलांनी जाणे का योग्य नाही, याचे स्पष्टीकरण दिले. या विषयाचा धांडोळा घेतल्यावर आज २१ व्या शतकातही महिला खरंच हतबल आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.वर्गभेद, लिंगभेद, वर्णभेद या गोष्टींवर अवलंबून कुठल्याही गोष्टीचा मज्जाव होणे बरोेबर नाही. आपण काळाप्रमाणे बदलले पाहिजे. भारतात सगळ्यांनाच न्यायदेवताही समान न्याय देते. मग देवाच्या दरबारी तरी वेगळा न्याय का असावा, असा प्रश्न मला पडतो. -मीनल उत्तुरकर, सदस्य, समता विचार प्रसारक त्या महिलांनी मंदिरात जाऊन योग्यच केले आहे. का जाऊ नये, याचे शास्त्रशुद्ध कारण द्यावे आणि हे कारण पटण्यासारखेही असावे. कुठल्याही देवाने स्त्रियांनी आत येऊ नये, असे सांगितले नाही. - स्वराली पाटील, विद्यार्थीशनी शिंगणापुरात चौथऱ्यावर जायला स्त्रियांचा अट्टाहास का? देवाचे पावित्र्य आपणच राखले पाहिजे. सर्वांनीच आपले हक्क आणि कर्तऱ्याचे पालन करणे गरजेचे आहे. जिथे पाहिजे तेथे स्त्रियांना त्यांचे हक्क दिले जातात. परमेश्वर एकच आहे. बाहेरून नमस्कार केला काय किंवा चौथऱ्यावर जाऊन केला तरी तो देवला पोहचाणारच आहे. आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी हॉस्पीटलला जातानाही आपण हात-पाय स्वच्छ धुतो, चप्पल बाहेर काढतो. मंिदर हे मन:शांती करणारे हॉस्पीटलच आहे. -मेधा सोमण, प्राध्यापिका महिलांना प्रवेश देणे गरजेचे आहे. मंदिरात जाऊ न देणे ही पूर्वंपार चालत आलेली परंपरा आहे. हा विरोध उगाचचा आहे. अशा लिंग भेदामुळेच आणि स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारामुळेच भारत देश अजूनही विकसनशीलच राहिला आहे. -अपर्णा कवी, इनरव्हील क्लब माजी अध्यक्षमंदिरात जाऊ न देणे हे चुकीचे आहे. न जाण्यामागचे काही कारणेही त्यांच्याकडे नाही. आपला समाज स्त्रीला माणूस म्हणून जगू देत नाहीत, त्यामुळे हा सगळ्या गोष्टी घडतात. डिस्क्रिमिनेशन करणे चुकीचे आहे आणि असे कुठल्याही देवाने सांगितले नाही. -अंशुल वागळे, विद्यार्थी