शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कारची काच फोडली

By admin | Updated: July 9, 2017 02:11 IST

पनवेल लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बबन काटकर यांच्या कारची काच फोडून मोबाइलसह चष्मा पळवून नेला आहे. प्रबळगड परिसरातील

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पनवेल लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बबन काटकर यांच्या कारची काच फोडून मोबाइलसह चष्मा पळवून नेला आहे. प्रबळगड परिसरातील धबधब्याजवळ हा प्रकार घडला असून, याविषयी नवीन पनवेल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये कारची काच फोडून आतील किमती साहित्य चोरून नेणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत सामान्य नागरिकांना चोरट्यांचा त्रास होत होता. आता पोलिसांनाही त्यांचा फटका बसू लागला आहे. पनवेल लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांना ट्रेकिंगची आवड आहे. पोलीस स्टेशनचे काम संपल्यानंतर वेळ मिळाला की सह्याद्रीच्या कडे-कपारीतील गड-किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जात असतात. २९ जून रोजी ते पोलीस स्टेशनमधील पोलीस शिपाई गणेश पवार यांच्याबरोबर प्रबळगडाच्या पायथ्याशी भटकंती करण्यासाठी गेले होते. गडाच्या पायथ्याशी गेल्यानंतर जवळच धबधबा असल्याची माहिती त्यांना मिळाली. पुढे गेल्यानंतर एक ठिकाणी अनेक मोटारसायकल उभ्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले. काही तरुण तेथे गप्पा मारत बसले होते. वाहन येथेच उभे करून एक किलोमीटर चालत जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतरांच्या सांगण्यावरून काटकर यांनी गडाच्या पायथ्याशी त्यांची कार एमएच १२ सीके १८५१ उभी केली होती. दुपारी ३ वाजता जाऊन दोघेही ४ वाजता परतल्यानंतर त्यांना धक्का बसला. अज्ञात व्यक्तींनी कारच्या काचेवर दगड मारून काचेचे तुकडे पडले होते. कारमध्ये ठेवलेला ओपो कंपनीचा ११ हजार रुपयांचा मोबाइल व लावरेन्स अ‍ॅण्ड मायो कंपनीचा ११ हजार रुपये किमतीचा गॉगलही चोरीला गेला आहे.