शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाख प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: June 28, 2017 03:10 IST

सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर बनला आहे. भुयारीमार्गाची दुरवस्था झाली आहे

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर बनला आहे. भुयारीमार्गाची दुरवस्था झाली आहे. रोडवर सर्वत्र खड्डे पडले असून, निकृष्ट कामामुळे रोज १० ते १५ अपघात होत आहेत. पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, एसपीटीपीएल व शासनाला शेकडो पत्रे दिली असून तीनही यंत्रणांनी दुरुस्तीचे काम करण्यास नकार दिला आहे. या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या दहा लाख प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली असून, शासकीय यंत्रणा व टोलवेज कंपनीविरोधात असंतोष वाढू लागला आहे. महामार्गावर उरण फाट्याजवळ चंद्रकांत येशी यांच्या मोटारसायकलला रविवारी पहाटे कंटेनरने धडक दिली. या आपघातामध्ये चंद्रकांत येशी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे महामार्गावरील प्रवास व वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी व अपघात कमी करण्यासाठी करोडो रुपये खर्च करून रोडचे रुंदीकरण केले आहे; परंतु ठेकेदाराने अद्याप काम पूर्ण केलेले नाही. रोडवर खड्डे पडले असून, उरण फाट्यावरील उड्डाणपुलावरील निसरड्या रोडमुळे रोज अपघात होत आहेत. रुंदीकरण केल्यानंतर या मार्गावरील वाहतूककोंडी व अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. उरण फाट्यावरील उड्डाणपुलावर पाऊस सुरू झाल्यापासून रोज किमान दहा अपघात होत आहेत. वाशी गावाजवळ भुयारी मार्गाचे काम अर्धवट राहिले आहे. तुर्भे पोलीस स्टेशनजवळील पादचारी पुलाचे काम अर्धवट राहिले आहे. शिरवणे भुयारी मार्ग व बाजूचा पूर्ण रोड खड्डेमय झाला असून तेथून वाहने चालविणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देणे, अशी स्थिती आहे. उरण फाटा हा तर मृत्यूचा सापळाच बनला आहे. सीबीडी जंक्शनजवळ अद्याप सिग्नल बसविण्यात आलेला नाही. खारघर ते कामोठेपर्यंतची स्थितीही बिकट असून याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसपीटीपीएल कंपनी या सर्वांना आतापर्यंत शेकडो पत्रे दिली आहेत. प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. अपघात वाढत आहेत. जीवित व वित्तहानी होत आहे. भविष्यात गंभीर अपघात होऊ शकतात. वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. भुयारी मार्गांचा काहीही उपयोग होत नाही. महामार्गावरील खड्डे भरण्यात यावेत. आवश्यक ती दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी पत्रांद्वारे केली आहे. पोलीस उपआयुक्त नितीन पवार यांनी टोलवेज कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी या सर्वांच्या अनेक वेळा बैठका घेतल्या आहेत; परंतु कोणीही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही. अखेर उरण फाट्याजवळील उड्डाणपुलावर खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून काम सुरू आहे.