शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल तालुक्यांतील शाळांचा दुसरा दिवस गेला विद्यार्थ्यांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 01:44 IST

ग्रामीण भागातील ३८ खासगी शाळा सुरू, पहिल्या दिवशी एक हजार ४०५ मुले हजर, ८ शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह

मयूर तांबडेनवीन पनवेल : पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील ३८ खाजगी शाळा सोमवारपासून सुरु झाल्या. मात्र मंगळ‌वारी विद्यार्थीच हजर नसल्याचे पाहायला मिळाले. पालिका हददीतील शाळा बंद आणि ग्रामीणच्या शाळा मात्र सुरू या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही या संभ्रमात पालक पडले आहेत.

सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील ३८ खाजगी शाळांमध्ये नऊ हजार ४८७ पैकी १ हजार ४०५ विद्यार्थी हजर होते. तर मंगळवारी 38 शाळांमध्ये एकही विद्यार्थी हजर नसल्याची माहिती देण्यात आलेली आहे. पनवेलच्या ग्रामीण भागात एकूण ५४ खाजगी शाळा आहेत, त्यापैकी ३८ शाळा सुरू झालेल्या आहेत. मात्र विद्यार्थ्याना शाळेत पाठवण्यास पालकांनी विरोध दर्शविला आहे. पनवेलपालिका हद्दीतील शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद करण्याचा निर्णय आयुक्तानी घेतला आहे. मात्र पनवेल ग्रामीणमध्ये नववी ते बारावीच्या शाळा बंद ठेवण्याचा असा कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला असल्याचे दिसून येत आहे. 

पहिल्या दिवशी पालकानी आपल्या पाल्याला शाळेत पाठवले. सुरक्षेची काळजी म्हणून खाजगी शाळेतील जवळपास चारशे शिक्षकांची कोरोना चाचणी केली आहे. यापैकी आठ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे.ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण ठाण्यातील शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तसा निर्णय रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यायला हवा होता असे पालकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :SchoolशाळाNavi Mumbaiनवी मुंबई