शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शाळेचा पाणीपुरवठा खंडित

By admin | Updated: November 18, 2016 02:53 IST

रद्द केलेल्या नोटा मीरा-भार्इंदर महापालिकेने स्वीकारण्यास सुरुवात केल्यानंतरही अनेक थकबाकीदारांनी अद्याप कर भरलेला नाही

भार्इंदर : रद्द केलेल्या नोटा मीरा-भार्इंदर महापालिकेने करवसुलीच्या माध्यमातून स्वीकारण्यास सुरुवात केल्यानंतरही अनेक थकबाकीदारांनी अद्याप कर भरलेला नाही. अशा थकबाकीदारांचा पाणीपुरवठाच खंडित करण्याची कारवाई पालिकेने सुरू केली आहे. १९ लाखांचा कर थकवल्याने एका शाळेचा पाणीपुरवठा बुधवारी खंडित करण्यात आला.नित्यानंद प्रबोधिनी विद्यालय असे शाळेचे नाव आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख वासुभाई नांबियार यांच्या नियंत्रणाखाली ही शाळा चालवली जाते. त्यात हिंदी माध्यमाचे सुमारे ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील मराठी माध्यमाचे शिक्षण पुरेशा पटसंख्येअभावी बंद झाल्याने तूर्तास हिंदी माध्यमाचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण सध्या सुरू आहे. शाळेच्या प्राथमिक विभागासाठी राज्य सरकारकडून अनुदान मिळते. एकूण १० शिक्षक येथे आहेत. या शाळेचा अंदाजे पाच वर्षांचा १९ लाखांचा मालमत्ताकर थकीत असल्याने पालिकेने अनेकदा शाळेला नोटिसा पाठवल्या. परंतु, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने ही शाळा थकबाकीदारांच्या यादीत समाविष्ट झाली. करवसुलीसाठी पालिकेने राजकीय दबावाखाली केवळ कागदी घोडे नाचवून कारवाई बासनात गुंडाळली. अखेर हजार, पाचशेच्या नोटा रद्द झाल्याने त्या कराच्या माध्यमातून कर स्वीकारण्यास पालिकेने सुरुवात केल्यानंतर थकीत कराच्या वसुलीला जोमाने सुरुवात झाली. करवसुली प्रभावीपणे राबवण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी थेट पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला. त्याचा पहिला बळी १४ नोव्हेंबरला भार्इंदर पश्चिमेकडील रॉयल रेसिडन्सी ही इमारत ठरली. सध्या या इमारतीमधील रहिवासी टँकरद्वारे पाणी विकत घेत आहेत. यानंतर, मोठ्या थकबाकीदारांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी आयुक्तांनी त्यांची यादीच प्रभाग अधिकाऱ्यांकडे सोपवली. हे अधिकारी सध्या त्या थकबाकीदारांचा शोध घेऊन कर जमा करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करीत आहेत. कर भरण्यास असमर्थता दर्शवणाऱ्या मीरा गावठाणमधील नित्यानंद शाळेचा पाणीपुरवठा बुधवारी खंडित केला. काही दिवसांपूर्वी शाळेने सुमारे ७ लाखांचा कर पालिकेत जमा केल्याचे शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, उर्वरित कर अद्याप थकीत राहिल्याने कारवाई करण्यात आल्याचे पालिकेने सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांना सोबत जास्तीतजास्त पाणी घेऊन यावे लागत असून इतर वापरासाठी आसपासच्या वस्तीतून पाण्याची सोय केली जात आहे. (प्रतिनिधी)