शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

धाटाव एमआयडीसीतील रस्त्यांची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 06:46 IST

रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीअंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने

धाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीअंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याला डबक्याचे स्वरूप आले आहे. सर्वत्र खड्डे पडलेल्या रस्त्यावरून चालताना पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांना कसरतच करावी लागत असून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून धाटाव औद्योगिक वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांनी आता डोके वर काढले आहे. सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांनी दहशत निर्माण केल्याने वाहनचालकांना याचा मोठा त्रास होत आहे. तर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी रस्त्याची ठेकेदारांकडून केलेली तोडफोड व थातूरमातूर मलमपट्टी ही अपघातास कारणीभूत ठरत आहे. औद्योगिक वसाहतीतील रस्ते खाली व नाले वर राहिल्याने पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नसल्याने रस्ते मात्र पाण्याखालीच राहत आहेत. रस्त्यालगतच्या मोऱ्या देखील ढासळल्याने दुचाकीचालकांना व कामगारांना त्या धोकादायक ठरत आहेत. रस्त्यावरील पथदिवे सुद्धा बऱ्याच वेळी काही ठिकाणी बंद अवस्थेत असल्याने चोरट्यांचाही मार्ग खुला झाला आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील वळणावर कारखानदारांनी लावलेल्या झाडाझुडपांचा अडथळा निर्माण झाल्यानेही अपघात झाल्याचे नागरिकांनी सांगितले. रस्त्यावरील खड्ड्यातून रेती, खडी व ग्रीट टाकून खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न होत असला तरी रस्त्यांची प्रकृती ढासळली असून अक्षरश: चाळण झालेल्या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे वाहनचालकांना चांगलीच डोकेदुखी झाली आहे. विद्यार्थ्यांना सायकलवरून शाळेत जाताना या खड्ड्यांमुळे कसरत करावी लागत आहे. रस्त्यांची अवस्था लवकर सुधारली नाही तर सगळा रस्ता खड्डेमय होऊन पादचाऱ्यांचा व कामगारांचा प्रवास खडतर झाला आहे. या रस्त्यांबाबत औद्योगिक विकास मंडळाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने लक्ष द्यावे व अंतर्गत रस्ते पूर्णपणे नव्याने करण्यात यावे, अशी मागणी कामगारांकडून होत आहे.