शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या भूखंडांवर आरक्षण प्रकरण; नगरविकास विभागाची महापालिकेला चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 02:12 IST

त्याचप्रमाणे, मागील काळात सिडकोने साडेबारा टक्के योजनेंतर्गत अनेक भूखंडांचे वाटप केले आहे

नवी मुंबई : प्रारूप विकास आराखडा तयार करताना महापालिकेने सिडकोला विश्वासात घेतले नाही. विविध प्रयोजनासाठी सिडकोने आरक्षित केलेल्या भूखंडांचाही या विकास आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. याबाबत नगरविकास विभागाने महापालिकेला चपराक दिली आहे. त्यानुसार, सिडकोच्या भूखंडांवरील आरक्षण वगळून सुधारित प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्याच्या सूचना राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिकेला दिल्या आहेत.

त्याचप्रमाणे, मागील काळात सिडकोने साडेबारा टक्के योजनेंतर्गत अनेक भूखंडांचे वाटप केले आहे, तर सुमारे दिडशे भूखंड या योजनेसाठी आरक्षित करून ठेवले आहेत, परंतु या भूखंडांवरही महापालिकेने आपल्या प्रारूप विकास आराखड्यात आरक्षण दर्शविले आहे. या संदर्भात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या दालनात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेने प्रारूप विकास आराखडा अद्याप प्रसिद्ध केला नसल्याने सिडकोच्या भूखंडांवरील आरक्षण वगळून सुधारित प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करावा, अशा सूचना भूषण गगराणी यांनी महापालिकेला दिल्या आहेत. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या अनेक भूखंडांचा मार्ग मोकळा झाला आहे, तसेच महापालिकेने प्रारूप विकास आराखडा मंजूर करताना प्रस्तावित केलेल्या भूखंडांवरील आरक्षणाची माहिती सिडकोला द्यावी. त्यामुळे सिडकोला त्यावर सूचना आणि हरकती नोंदविणे शक्य होईल, असेही नगरविकास विभागाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

३ वर्षे विकास रखडलामहापालिकेने तयार केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात सिडकोने निविदा प्रक्रियेद्वारे विक्री केलेल्या सुमारे १२ भूखंडांवर आरक्षण प्रस्तावित करण्यात आले आहे. यापैकी काही भूखंडधारकांनी बांधकाम परवानगीसाठी महापालिकेकडे अर्ज केला असता, प्रारूप विकास आराखड्यात संबंधित भूखंडावर आरक्षण प्रस्तावित केल्याचे समोर आले. त्यामुळे महापालिकेने सदर भूखंडधारकांना बांधकाम परवानगी नाकारली आहे. परिणामी, मागील तीन वर्षांपासून या भूखंडांचा विकास रखडल्याने भूखंडधारक हवालदील झाले आहेत. 

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका