शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दिघ्यात रहिवाशांचा आक्रोश

By admin | Updated: October 3, 2015 02:38 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिघ्यातील ९९ बेकायदा बांधकामांवर एमआयडीसीने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे जवळपास २0 हजार रहिवासी बेघर होणार आहे

कमलाकर कांबळे, नवी मुंबईउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिघ्यातील ९९ बेकायदा बांधकामांवर एमआयडीसीने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे जवळपास २0 हजार रहिवासी बेघर होणार आहे. यातील बहुतांशी कुटुंबे आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील आहेत. आपल्या गृहस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी अनेकांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी येथे खर्ची घातली आहे. दुर्दैवाने आता त्यांच्यावर बेघर होण्याची पाळी आली आहे. विशेष म्हणजे या परिस्थितीला जबाबदार असणारे नामानिराळेच राहिले आहेत. त्यांच्या पापाची शिक्षा या गरीब कष्टकऱ्यांना भोगावी लागत आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहेत. सिडको, महापालिका आणि एमआयडीसी या तीन प्राधिकरणांच्या वादात येथील भूमाफियांचे फावले आहे. याचा परिणाम म्हणून मागील दीड दशकात शहरात बेकायदा बांधकामांना ऊत आला आहे. विशेषत: गाव - गावठाणात गरजेपोटीच्या नावाखाली प्रकल्पग्रस्तांनी फिफ्टी-फिफ्टीच्या बांधकामांचा धडाका लावला. दिघा परिसरात तर भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. मोकळ्या जागा बळकावून त्यावर सर्रास इमारती उभारल्या जात आहेत. बैठ्या चाळी बांधून त्या गरजूंच्या माथी मारल्या जात आहेत. दिवसाआड नवीन झोपड्या उभारल्या जात आहेत. अशा अनधिकृत प्रकल्पातील घरे स्वस्त असल्याने दहा ते बारा लाखांचे बजेट असणाऱ्या कष्टकऱ्यांनी आपल्या आयुष्याची कमाई खर्च करून येथे घरे घेतली आहेत. आरटीआय कार्यकर्ते राजीव मिश्रा हे मागील सहा वर्षांपासून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात लढा देत आहेत. त्यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने दिघ्यातील ९९ बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसीने सोमवारपासून या परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे या इमारतींतून राहणाऱ्या रहिवाशांचे धाबे दणाणले आहेत. नवी महापालिकेची उदासीनताअप्रत्यक्षपणे भूमाफियांना झुकते माप देणाऱ्या महापालिकेने सर्वसामान्यांची फसवणूक टाळण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. उलट अनधिकृत बांधकामांना रातोरात नळजोडण्या देण्यात आल्या. महावितरणने तातडीने वीज पुरवठा दिला. त्यामुळे ही घरे अधिकृत असल्याचे भासविण्यात भूमाफियांना यश आले. त्याद्वारे अनेक गरजू लोकांना फसविण्यात आले. नियोेजन प्राधिकरण या नात्याने अनधिकृत घरांच्या विक्रीला चाप लावणे महापालिकेला शक्य होते. त्यात महापालिकेकडून कुचराई झाली आहे. महापालिकेच्या उदासीनतेमुळे साधारण सव्वा लाख रहिवाशांवर बेघर होण्याचे संकट ओढावले आहे. विशेष म्हणजे अनधिकृत घरे विकत घेवू नये, अशा आशयाचे फलक गावांच्या प्रवेशद्वारावर लावण्याच्या सूचना माजी मंत्री गणेश नाईक यांनी प्रशासनाला केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले.महापालिकेचे वॉर्ड अधिकारी, वीज जोडण्या देणारे महावितरणचे अधिकारी, पोलीस व स्थानिक नगरसेवक यांच्यातील अर्थपूर्ण समझोत्यामुळेच शहरात बेकायदा बांधकामांचा भस्मासुर पोसला गेला आहे. तर मतांच्या राजकारणासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भूमाफियांना पाठीशी घालणारे येथील खासदार व आमदारही तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत असताना या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांची चौकशी व्हायला हवी. 99आरटीआय कार्यकर्ते राजीव मिश्रा हे सहा वर्षांपासून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात लढा देत आहेत. दिघ्यातील ९९ बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.