शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पोलिसांच्या जीपची कारला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 06:50 IST

रेल्वे पोलिसांच्या जीपने फॉर्च्युनर कारला धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना पामबीच मार्गावर शनिवारी रात्री घडली. अपघातामध्ये कारमधील

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : रेल्वे पोलिसांच्या जीपने फॉर्च्युनर कारला धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना पामबीच मार्गावर शनिवारी रात्री घडली. अपघातामध्ये कारमधील तिघे जण जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरधाव कारने पोलिसांच्या जीपला कट मारल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ती फॉर्च्युनरला धडकल्याने हा अपघात झाला.शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास पामबीच मार्गावर नेरुळ येथे हा अपघात झाला. मुंबई रेल्वे पोलिसांची जीप वाशीच्या दिशेने येत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारच्या चालकाने हुलकावणी दिली. कार चालकाने अचानकपणे मारलेल्या कटमुळे पोलिसांच्या जीप चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे जीप दुसऱ्या लेनमध्ये जावून फॉर्च्युनर कारला धडकली. तर जीपच्या धडकेने फॉर्च्युनर कार दुभाजकाला धडकून पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की फॉर्च्युनर कारने दोन पलटी मारल्या. अपघातामध्ये जीवितहानीची शक्यता निर्माण झाली होती. मात्र वेळीच काही प्रत्यक्षदर्शींनी दोन्ही अपघातग्रस्त वाहनांकडे धाव घेवून आतमधील व्यक्तींना बाहेर काढले. यावेळी फॉर्च्युनरमधील एक महिला व दोघे पुरुष जखमी असल्याचे आढळून आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच सीवूड वाहतूक पोलीस व नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही अपघातग्रस्त वाहने मार्गातून बाजूला हटवून वाहतुकीतला अडथळा दूर करण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले.अपघातावेळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांच्या जीपला कट मारणाऱ्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला असून त्याचा शोध सुरू असल्याचे नेरुळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक थारकर यांनी सांगितले.