शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी नगरसेवकांचे प्रस्ताव रखडविले

By admin | Updated: October 1, 2015 23:53 IST

महापालिकेमध्ये शिवसेना, भाजपा नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे रखडविली जात आहेत. विकासकामांचा शुभारंभ करताना पालकमंत्री, खासदार व आमदारांना डावलले

नवी मुंबई : महापालिकेमध्ये शिवसेना, भाजपा नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे रखडविली जात आहेत. विकासकामांचा शुभारंभ करताना पालकमंत्री, खासदार व आमदारांना डावलले जात असल्याविषयी भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना व भाजपा नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. महापालिका निवडणुका झाल्यापासून शहरातील विकासकामे वेगाने होत नाहीत. विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागातील कामे होत नाहीत. विकासकामे तत्काळ मार्गी लावण्याची मागणी केली. महापालिका शहरातील विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन करताना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे व आमदार मंदा म्हात्रे यांना डावलत असल्याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. कार्यक्रम पत्रिकेवर माजी खासदार व माजी पालकमंत्र्यांची नावे अगोदर टाकली जात असून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे नाव खाली टाकले जात आहे. आम्हाला प्रसिद्धी नको आहे. परंतु पूर्वी राजशिष्टाचाराचे कारण सांगून विधान परिषद सदस्य असल्याचे सांगून कार्यक्रमांचे आमंत्रण दिले जात नव्हते. दिवाळे गावच्या जेट्टीच्या पाटीवर नाव नसल्यामुळेही तत्कालीन आमदार व मंत्र्यांनी आक्षेप घेतले होते. मग ते आता राजशिष्टाचार का पाळत नाहीत, असा प्रश्न आयुक्तांसमोर उपस्थित करण्यात आला. आमदार म्हात्रे यांनी पालिकेच्या कामकाजावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पालिकेच्या कामांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. विधानसभेत हक्कभंग दाखल केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही विकासकामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक मनोज हळदणकर, एम. के. मढवी, संजू वाडे, माजी विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील, काशिनाथ पवार, शहर प्रमुख विजय माने, संपत शेवाळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)