शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील गाळाचा अडथळा

By admin | Updated: September 22, 2015 03:50 IST

वाशीच्या तलावातील गाळामुळे दहाव्या दिवशीच्या विसर्जनात अडथळा होवू लागला आहे. तलावाच्या एकुन पातळीच्या निम्म्या भागात गाळ साचल्याने त्यामध्ये स्वयंसेवकाचे पाय रुतत आहेत.

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईवाशीच्या तलावातील गाळामुळे दहाव्या दिवशीच्या विसर्जनात अडथळा होवू लागला आहे. तलावाच्या एकुन पातळीच्या निम्म्या भागात गाळ साचल्याने त्यामध्ये स्वयंसेवकाचे पाय रुतत आहेत. तर हिच परिस्थीती शहरातील इतर विसर्जन तलावांमध्येही असण्याची शक्यता आहे.गणरायाचे वाजत गाजत आगमण झाल्यानंतर दुसरयाच दिवसापासून दिड दिवसाच्या विसर्जनाला सुरवात झाली आहे. शहरात विसर्जनात कसलाही अडथळा होवू नये याकरिता पालिका प्रशासन पहिल्या दिवसापासून सज्ज आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रात २३ तलावांच्या ठिकाणी विसर्जन होत असते. त्यापैकी वाशीतील तलाव विसर्जनाचे महत्वाचे ठिकाणी आहे. त्याठिकाणी शहरातल्या मोठ्या मुर्तींचे विसर्जन होत असते. विसर्जन होणारया मुर्तींमध्ये घरगुती तसेच सार्वजनीक मंडळाच्या पाच ते अकरा फुट उंचीच्या मुर्तींचा समावेश असतो. मात्र यंदा प्रशासनाच्या उदासिनतेमुळे वाशीतील तलावात विसर्जनाला अडथळा होणार आहे.या तलावांमध्ये प्रतीवर्षी गणेशमुर्तींचे तसेच देवींचे विसर्जन होत असते. यामुळे प्रतीवर्षी विसर्जन झाल्यानंतर तलावांमधील गाळ काढणे आवश्यक आहे. परंतु या कामात हलगर्जीपना दाखवत दोन वर्षांनी तलावातील गाळ काढण्याचे धोरण पालिका राबवत आहे. परिणामी वाशीतील तलावाचा गाळ दोन वर्षापासून न काढल्याने २० फुट खोलीच्या या तलावात १५ फुटापर्यंत गाळ साचला आहे. त्यामुळे उर्वरित ४ ते ५ फुटाच्या पाण्यातच यंदाच्या गणेशमुर्तीचे विसर्जन करावे लागणार आहे. त्याचा त्रास तलावाच्या ठिकाणी गणेशमुर्ती विसर्जनासाठी नेमलेल्या स्वयंसेवकांना होत आहे. पाच व सात दिवसाच्या गणेशमुर्तीचे विसर्जन झाल्यानंतर दहाव्या दिवशी विसर्जीत होणारया मुर्ती पाण्यात बुडण्याऐवजी तरंगताना दिसण्याची शक्यता आहे. सध्या तलावात साचलेल्या गाळावरुन पाच फुट उंचीचा कोणताही तरुण सहज चालत जावू शकतो. तसे प्रात्यक्षिक देखिल तलावाच्या ठिकाणी नेमलेल्या एका स्वयंसेकाने करुन दाखवले. गणेशमुर्तींचा गाळ पायाखाली तुडवावा लागत असल्याचा संतापही या स्वयंसेवकांनी व्यक्त केला आहे.