शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण निधीसाठी पोलिसांचा ‘उत्सव‘

By admin | Updated: March 21, 2017 02:09 IST

पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता कल्याण निधी संकलनासाठी नवी मुंबई पोलिसांतर्फे ‘उत्सव २०१७’ या भव्य कार्यक्रमाचे

नवी मुंबई : पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता कल्याण निधी संकलनासाठी नवी मुंबई पोलिसांतर्फे ‘उत्सव २०१७’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नेरुळच्या डी.वाय. पाटील स्टेडिअमवर झालेल्या या कार्यक्रमास सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थित राहून प्रेक्षकांची मने जिंकली. या वेळी कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू झालेल्या दोघा पोलिसांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आर्थिक मदत करण्यात आली.पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कल्याणाकरिता नवी मुंबई पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. पोलिसांच्या कुटुंबीयांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, पोलीस पुत्रांसाठी अभ्यासिका बांधणे अशा कामांचा यामध्ये समावेश आहे. त्यासाठी निधी उभा करण्याच्या उद्देशाने शनिवारी ‘उत्सव २०१७’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास पोलीस महासंचालक सतीश माथुर, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते. त्याशिवाय ज्येष्ठ सिनेअभिनेते बोमन ईराणी, सचिन पिळगावकर, गुलशन ग्रोवर, विवेक ओबेरॉय, साजीद नाडीयादवाला, मृणाल कुलकर्णी, रश्मी देसाई, गणेश आचार्य, वैशाली सामंत, वैशाली माडे यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. त्यापैकी अनेकांनी मंचावर आपली नृत्याची व गायनाची कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमादरम्यान दीपक डोंगरे व मधुकर पागी या नवी मुंबई पोलीस दलातील दोघा मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना अनुक्रमे २५ लाख व १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या वेळी अमृता फडणवीस यांनी शहिदांच्या पत्नींना धीर देत, पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले. तर प्रत्येक पोलिसांपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांचे राज्य व देशासाठी मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. तर अभिनेता विवेक ओबेरॉय याने स्वत:च्या गृहप्रकल्पांची माहिती देत शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांकरिता प्रत्येक प्रकल्पात २५ घरे मोफत देण्याची घोषणा केली.