शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्टच्या अर्जदारांमध्ये वाढ

By admin | Updated: October 3, 2015 23:32 IST

नवी मुंबईमधील हॉट डेस्टीनेशन म्हणून खारघर ओळखले जाऊ लागले आहे. या ठिकाणचे प्रकल्प, निसर्गाची जोड, सुनियोजित रस्त्यामुळे प्रत्येकाला खारघरमध्ये राहण्याचा मोह

- वैभव गायकर,  पनवेलनवी मुंबईमधील हॉट डेस्टीनेशन म्हणून खारघर ओळखले जाऊ लागले आहे. या ठिकाणचे प्रकल्प, निसर्गाची जोड, सुनियोजित रस्त्यामुळे प्रत्येकाला खारघरमध्ये राहण्याचा मोह आवरता येत नाही. यामुळेच उच्चवर्गीयांचे शहर म्हणून खारघर शहराची ओळख निर्माण होत असताना पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्याही खारघरमध्ये वाढत आहे. शहराची लोकसंख्या सध्या ३ लाखांच्या घरात आहे. शैक्षणिक केंद्र म्हणून शहर विकसित होत असून देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक खारघरसारख्या शहरामध्ये स्थलांतरित होत आहेत.गतवर्षी आयुक्तालयामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, जवळजवळ ४,५०० नागरिकांनी खारघरमधून पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज केले होते. येथील गोपनीय विभागांकडे आकडेवारी उपलब्ध आहे. यंदा आतापर्यंत ४,३०० नागरिकांनी पासपोर्टसाठी अर्ज भरले असून वर्षभरात हा आकडा ५००० पेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी राहणारे उच्चशिक्षित नागरिक, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींबरोबरच स्वत:ची ओळख व पक्का पत्ता यासाठीही नागरिक पासपोर्ट आवेदन करत असतात. यामधील केवळ १० टक्के पासपोर्टधारकच परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढत असल्याची माहिती उघड झाली आहे. पासपोर्ट काढणाऱ्यांमध्ये ७० टक्के अमराठी नागरिक आहेत. उच्चवर्गीयाची रहदारी, आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प यामुळे शहराची ओळख देशात महत्त्वाच्या शहरापैकी एक म्हणून होत आहे. शहरात एकूण ४० सेक्टर असून यापैकी निम्म्या सेक्टरमध्ये नागरिकांची रहदारी वाढलेली नाही. शिक्षणाचे माहेरघर म्हणून विकसित होणाऱ्या खारघरमध्ये १५ पेक्षा जास्त विद्यालये व महाविद्यालये असून याठिकाणीही अनेक परप्रांतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या या ठिकाणी लोकसंख्या ३ लाखांच्या घरात असली तरी नजीकच्या काळातच हा आकडा ५ लाखांच्या वर जाणार आहे. तसेच आंतराष्ट्रीय विमानतळ , मेट्रो प्रकल्प यामुळे देखील देशभरातून नागरिक या ठिकाणी स्थायिक होतील. सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग यासारखी सहज कनेक्टिव्हिटी असल्यामुळे व्यापारी वर्गाला देखील हे शहर भुरळ घालत आहे