शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

उरण - वाशी मार्गावरील प्रवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2015 00:15 IST

नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसेसमध्ये वाशी बस स्थानकात सायंकाळी सहा ते आठ दरम्यान अपुऱ्या बसेसमुळे विद्यार्थिनी, महिला

उरण : नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसेसमध्ये वाशी बस स्थानकात सायंकाळी सहा ते आठ दरम्यान अपुऱ्या बसेसमुळे विद्यार्थिनी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची होणारी गर्दी आणि याच गर्दीचा फायदा उठवित बसमध्येच होत असलेल्या पाकीटमारीच्या वाढत्या घटनांमुळे उरण - वाशी मार्गावरील प्रवासी त्रस्त आहेत. विशेषत: विद्यार्थिनी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सुटका करण्यासाठी सायंकाळी सहा ते आठ दरम्यान उरण - वाशी मार्गावर जादा बसेस करण्याची मागणी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी परिवहन सभापतींकडे केली आहे.नवी मुंबई परिवहन सेवेच्या चांगल्या सेवेमुळे उरणकरांसाठी उपयुक्त ठरु लागली आहे. या सेवाचा लाभ बहुतांश उरणकर घेत आहेत. उरणमध्ये उच्च आणि तांत्रिक शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे शिक्षणासाठी आणि रोजगाराच्या निमित्ताने दररोज हजारो विद्यार्थिनी, महिला उरण - वाशी या मार्गावर प्रवास करीत आहेत. यामध्ये विविध कामानिमित्ताने ये - जा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. तसेच गर्दीचा गैरफायदा घेत काही समाजकंटक महिलांना धक्काबुक्कीही करतात. शिवाय बसमध्येच होत असलेल्या पाकीटमारीच्या वाढत्या घटनांचाही कटू अनुभव घेण्याची वेळ प्रवासी वर्गावर येते. त्यामुळे विद्यार्थिनी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सुटका करण्यासाठी सायंकाळी सहा ते आठ दरम्यान उरण - वाशी मार्गावर जादा बसेस करण्याची मागणी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी परिवहन सभापतींकडे केली आहे. (वार्ताहर)