शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम परवानगीसाठी पार्किंग सक्ती

By admin | Updated: March 21, 2017 02:11 IST

पनवेल शहराप्रमाणे सिडको वसाहतीतही सध्या पार्किंगची समस्या उद्भवत आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पार्र्किं गसाठी जागाच नसल्याने

अरुणकुमार मेहत्रे / कळंबोलीपनवेल शहराप्रमाणे सिडको वसाहतीतही सध्या पार्किंगची समस्या उद्भवत आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पार्र्किं गसाठी जागाच नसल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जातात. परिणामी वाहतूककोंडी होते. यावर तोडगा म्हणून पनवेल महापालिकेने यापुढे बांधकाम परवानगी देताना पार्किंगची सक्ती केली आहे. महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या आराखड्यात या नवीन धोरणाची भर पडणार आहे. पनवेल शहरात पूर्वी ज्या सोसायट्या बांधल्या त्यामध्ये पार्किंगची सोय नाही. त्यामुळे वाहने रस्त्यावर लावून सार्वजनिक ठिकाणी वाहतूककोंडीला निमंत्रण दिले जात आहे. नियोजित शहरे असा नामोल्लेख असलेल्या सिडको वसाहतीतील स्थितीही फारशी वेगळी नाही. नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर या वसाहतीत अनेक इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. त्यापैकी बहुतांशी इमारतींमध्ये वाहने उभी करण्याकरिता जागा नसल्याने वाद निर्माण होत आहे. या विषयांवरून सोसायटीतील अंतर्गत शांतता भंग पावू लागली आहे.खारघरमधील वसाहतीमध्ये ही समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या येथील सोसायट्यांमध्ये एका कुटुंबात दोन, तीन वाहने आहेत. त्यामुळे पार्किंग जागा व वाहनांची संख्या यामध्ये ताळमेळ बसत नाही. सार्वजनिक पार्किंगची व्यवस्था या वसाहतीत नाही. त्यामुळे बहुतांशी वाहने रस्त्यावर उभी केली जातात. काही सोसायट्यांमध्ये बाहेरच्या वाहनांना नो इंट्री आहे. त्यामुळे पाहुणे म्हणून आलेली मंडळी आपली चारचाकी वाहनेरस्त्यावर उभी करतात. यावर तोडगा म्हणून सिडकोने सार्वजनिक वाहनतळ उभारणे आवश्यक होते. परंतु सिडको वसाहतीत अशा प्रकारचे पार्किंग झोन नाहीत. बांधकाम परवानगी देताना इमारतीत एकूण सदनिका, त्यासाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था यांची तपासणी होणे आवश्यक होते. त्यानंतर सिडकोने सीसी व ओसी द्यायला हवी होती. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नियोजित शहरांमध्येही पार्किंगची समस्या भेडसावत आहे. आगामी काळात ही गुंतागुत वाढू नये म्हणून महापालिकेने याबाबत विशेष खबरदारी घेतली आहे. सिडकोने बांधकाम परवानगीचे अधिकार काही महिन्यांपूर्वी पनवेल महापालिकेला वर्ग केले आहेत. त्यानुसार तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांनी बांधकाम विभागाला आपल्या इमारतीच्या नियोजनात पार्किंगची सोय असल्याशिवाय परवानगी न देण्याचे आदेश निर्गमित केले असून संबंधिताकडून काटेकोर पालनाच्या सूचनाही दिल्या आहेत.