शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

गावकीच्या सदस्यांचा सामोपचारास विरोध

By admin | Updated: January 11, 2015 01:12 IST

रायगड जिल्ह्यातील सामाजिक बहिष्कार व वाळीत टाकण्याच्या प्रकरणांत वरिष्ठ महसूल व पोलीस अधिकारी प्रत्यक्ष गावांत जाऊन दोन्ही पक्षांच्या बैठका घेत आहेत.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सामाजिक बहिष्कार व वाळीत टाकण्याच्या प्रकरणांत वरिष्ठ महसूल व पोलीस अधिकारी प्रत्यक्ष गावांत जाऊन दोन्ही पक्षांच्या बैठका घेत आहेत. सामंजस्याने प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र गावकीमधील सदस्य सामोपचाराची भूमिका स्वीकारत नसल्याने रोहा तालुक्यातील शेणवई-डोंगरी गावातील २२ कुटुंबांच्या सामाजिक बहिष्काराच्या प्रश्न जैसे थे आहे.
गावातील मंदिरांमध्ये बंदी, किराणा दुकानात बंदी, नातेवाईकांबरोबर बोलण्यास बंदी अशी बंधने गावकीच्या पंचांनी घातली आहेत. त्यामुळे गावातील पंच कमिटीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या २२ कुटुंबियांनी जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्याकडे गुरुवारी केली. तत्पूर्वी सोमवार, ५ जानेवारीला रोहा उपविभागीय महसूल अधिकारी सुभाष बागडे व रोहा उप विभागीय पोलीस अधिकीर अमोल झेंडे यांनी गावात संयुक्त बैठक घेतली होती. परंतु सामोपचाराची भूमिका गावकीच्या पंचांनी स्वीकारली नसल्याने प्रश्न सुटू शकला नाही.
वाळीत असलेल्या सत्यवान मढवी यांना त्यांच्या वडीलांच्या अंत्यविधीत सहभागी होण्यास मनाई केल्याची त्यांची तक्रार आहे. या बाबत पोलिसांत तक्रार देवूनही रोहा पोलिसांनी कारवाई केली नाही, असे तक्रार अर्जात नमुद केले आहे. गावातील हनुमान पालखीच्या वेळेस वाद झाल्याने अन्य २३ कुटुंबांना वाळीत टाकले असल्याचे गणपत मढवी, सतेज शिंदे, केशव मढवी यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
(विशेष प्रतिनिधी )

कारवाईचे निवेदन
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मतदान केले नाही, असा आरोप करुन वाळीत टाकल्याचे नामदेव मढवी, काशिनाथ शिंदे, स्वप्नील शिंदे, किशोर भोनगे, मोतीराम शिंदे, यशवंत भगत, संतोष झावरे, रमेश भोनगे यांनी अर्जात म्हटले आहे. बावीस जणांच्या निवेदनात गावाचे पंच म्हणून गणेश कृष्णा मढवी, महेंद्र देवजी शिंदे, दिनेश कृष्णा मढवी, मोहन महादेव भोनगे, विठोबा कृष्णा भोनगे, उत्तम कृष्णा झावरे, नितीन हिराजी शिंदे, सुनील सिताराम शिंदे, हेमंत विठ्ठल झावरे, अरुण माया मढवी, चंद्रकांत लक्ष्मण शिंदे, दत्ताराम काशिनाथ शिंदे, शेखर तुकाराम मढवी, सुधाकर कृष्णा झावरे, परशुराम हरिश्चंद्र शिंदे, रोहिदास गोविंद शिंदे, शांताराम नाना झावरे, शांताराम हाडक्या शिंदे, रामचंद्र काशिनाथ भोनगे, महादेव काशिनाथ भोनगे, राम बाळकृष्ण झावरे, कृष्णा देवजी भोनगे, राजेंद्र पांडुरंग शिंदे, लिलाधर चंद्रकांत मढवी, विश्वनाथ कमलाकर झावरे, मदन सुदाम शिंदे, ताराचंद लक्ष्मण शिंदे, सुरेश अनंत शिंदे यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.