शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

मैदानात सभामंडपाला विरोध

By admin | Updated: March 20, 2017 02:21 IST

सीबीडीत एकाच सेक्टरमध्ये दोन सभामंडप उभारून पालिकेतर्फे होत असलेल्या आर्थिक उधळपट्टीला रहिवाशांनी विरोध केला

नवी मुंबई : सीबीडीत एकाच सेक्टरमध्ये दोन सभामंडप उभारून पालिकेतर्फे होत असलेल्या आर्थिक उधळपट्टीला रहिवाशांनी विरोध केला आहे. त्याठिकाणी यापूर्वीचे एक सभामंडप असतानाही अवघ्या चारशे मीटरवर दुसरे सभामंडप कशासाठी? असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. शिवाय नव्याने होत असलेला सभामंडप हा खेळाच्या मैदानात असल्यामुळे स्थानिकांनी पालिकेच्या या कामाला विरोध दर्शवला आहे.अनावश्यक खर्च टाळण्याच्या उद्देशाने मागील काही महिन्यात महापालिकेने अनेक कामांना स्थगिती दिलेली आहे. परंतु प्रशासनाचे हे धोरण दुटप्पी असल्याचे दर्शवणारा प्रकार सीबीडी येथे घडला आहे. सीबीडी सेक्टर ८ येथील आर्टिस्ट व्हिलेजमध्ये पालिकेने नव्या सभामंडपाचे काम हाती घेतले आहे. मात्र या नव्या सभामंडपाच्या कामाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. हा सभामंडप मैदानात उभारला जात आहे. यामुळे स्थानिक मुलांच्या क्रीडा स्पर्धांवर संक्रांत येवू शकते. रहिवाशांनी यासंबंधीचे पत्रही पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिले आहे. एकीकडे महापालिका अनावश्यक खर्च टाळण्याचा दिखावा करत कामांना स्थगिती देत आहे. दुसरीकडे मात्र अनावश्यक कामांच्या माध्यमातून जनतेच्या पैशाची उधळपट्टी होत आहे. त्यामुळे एकाच सेक्टरमध्ये पूर्वीचे सभामंडप असताना नव्या सभामंडपासाठी होणारा खर्च पालिकेने टाळावा. शिवाय तरुणांचे हक्काचे खेळाचे मैदान प्रशासनानेच हिरावून घेवू नये, अशीही त्यांची मागणी आहे.