शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

...तरच अजित पवार-तटकरेंवर गुन्हे

By admin | Updated: September 1, 2015 04:23 IST

सिंचन घोटाळ्याप्रकरणी ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर गुन्हे दाखल होतील का,

ठाणे : सिंचन घोटाळ्याप्रकरणी ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर गुन्हे दाखल होतील का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, अशी माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली.जलसंपदा विभागाकडून बांधल्या जाणाऱ्या धरणांच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत तक्रारी आल्यानंतर शासनानेच कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या प्रकल्पांची चौकशी करण्यास लाचलुचपत विभागाला सांगितले. त्यानुसार, ठाणे लाचलुचपत विभागामार्फत विशेष चौकशीस सुरुवात केली. त्यानुसार बाळगंगा, काळू आणि कोंडाणा या धरणांबाबत चौकशीला सुरुवात झाली आहे. मागील सहा ते सात महिन्यांच्या चौकशीनंतर पहिला गुन्हा मंगळवारी ठाण्यात दाखल झाला. बाळगंगा प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत. त्या वेळी शासकीय अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांकडे करोडोंचे घबाड असल्याचे समोर आले आहे. तर, दोघांना अटक झाली आहे. अटकेतील कंत्राटदार निसार खत्री हा अजित पवारांच्या जवळचा असल्याचे बोलले जात असल्याने त्याला १२ प्रकल्पांची कामे मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.बाळगंगा आणि काळू प्रकल्पाच्या वेळी अजित पवार आणि कोंडाणा प्रकल्पाचा वेळी सुनील तटकरे हे दोघे जलसंपदामंत्री होते. त्याच अनुषंगाने या दोघांना लाचलुचपत विभागाकडून या गैरव्यवहारासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची पूर्ण उत्तरेही दिलेली नाही. याचदरम्यान, त्यांनाही ठाण्यात चौकशीसाठी वेगवेगळे बोलावण्यात आले होते. मात्र, दोघांनी चौकशीस दांडीच मारली. याचदरम्यान, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागल्यावर जर शासनाने ठरवले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर लोकमतला दिली. शासकीय अधिकाऱ्यांच्या गळ्यास दुसऱ्या चौकशीचा पाश लवकरच आवळला जाणार आहे. त्यांच्या घरझडतीत सापडलेली संपत्ती त्यांना मिळणाऱ्या पगारातून ते खरेदी करू शकत होते का, याची वेगळी तपासणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)