मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात एक ठार; एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 05:22 IST2019-11-11T05:21:56+5:302019-11-11T05:22:04+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर पेणनजीक गोविर्ले गावाजवळ झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाले.

One killed in accident on Mumbai-Goa highway; A serious one | मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात एक ठार; एक गंभीर

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात एक ठार; एक गंभीर

वडखळ : मुंबई-गोवा महामार्गावर पेणनजीक गोविर्ले गावाजवळ झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाले. केशव मानकावले (रा. गणपतीवाडी) आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष हरिभाऊ पाटील (रा. पेण) हे चारचाकी गाडी घेऊन रविवारी सायंकाळी पनवेलहून पेणच्या दिशेने येताना मुंबई-गोवा महामार्गावरील गोविर्ले गावानजीक रस्त्याखाली दरीत गाडी जाऊन अपघात घडला. रस्त्याजवळून पाइपलाइनवर सिमेंट काँक्रीट केले होते, त्यामुळे साइडपट्टी व पाइपलाइनमध्ये गाडी अडकल्याने हरिभाऊ पाटील व केशव मानकावले यांना जबर मार लागून ते अडकले. यात हरिभाऊ यांचा मृत्यू झाला.

Web Title: One killed in accident on Mumbai-Goa highway; A serious one