शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली साफसफाई

By admin | Updated: October 1, 2015 02:03 IST

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन करण्यासाठी पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी स्वत: नेरूळ रेल्वे स्टेशन परिसराची साफसफाई केली.

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन करण्यासाठी पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी स्वत: नेरूळ रेल्वे स्टेशन परिसराची साफसफाई केली. यावेळी आरोग्य रक्षणासाठी मास्क, हातमोजे यांचा वापर केला. परंतु दुसरीकडे वर्षानुवर्षे कचरा वेचण्याचे व सफाईचे काम करणाऱ्या कामगारांना मात्र या सुविधा अद्याप मिळत नाहीत. नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छतेचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेमध्येही शहराचा समावेश झाला असून देशात तिसरे मानांकन मिळाले आहे. या अभियानामध्ये प्रथम क्रमांक मिळावा यासाठी महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच भाग म्हणून महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी नेरूळ रेल्वे स्टेशन परिसरात साफसफाई मोहीम राबविली. पालिका प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्वच नागरिकांनी स्वागत केले. स्वत: मोहिमेत भाग घेवून अधिकाऱ्यांनी शहरवासीयांना स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी वैयक्तिक व शहर स्वच्छतेची शपथ घेतली. एक दिवसाच्या स्वच्छता मोहिमेसाठी अधिकाऱ्यांनी पांढरे शुभ्र टी शर्ट, हातमोजे, तोंडावर मास्क, पायात बुट सुस्थितीमध्ये असलेले झाडू घेवून परिसर साफ केला. परंतु दुसरीकडे रोज साफसफाईचे व कचरा उचलण्याचे काम करणारे कर्मचारी मात्र पुरेशा सुविधा नसतानाही हे काम करत आहेत. शहरातील कंत्राटी कामगारांच्या तोंडाला मास्क, हातात मोजे व पायात बुट कधीच दिसत नाहीत. कामगारांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून अनेकांना श्वसनाचे व इतर आजार झाले आहेत. शहर स्मार्ट बनविण्यासाठी या कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आवश्यक सुविधा कधी मिळणार असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)