शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये एनएमएमटी बससेवा

By admin | Updated: October 8, 2015 23:40 IST

शहरात नगरपरिषदेच्या स्वत:च्या मालकीची बससेवा सुरू होण्यापूर्वीच नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या परिवहन उपक्रमाअंतर्गत एनएमएमटी बससेवा सुरू करण्यात येत

पनवेल : शहरात नगरपरिषदेच्या स्वत:च्या मालकीची बससेवा सुरू होण्यापूर्वीच नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या परिवहन उपक्रमाअंतर्गत एनएमएमटी बससेवा सुरू करण्यात येत आहे. शुक्रवारी ही बस पनवेलमध्ये धावणार आहे. पनवेल रेल्वे स्थानक ते साई नगर या मार्गावर ही बस सुरू होणार आहे. सिटीझन युनिटी फोरम आणि जनजागृती ग्राहक मंच पनवेल शाखा यांच्या पाठपुराव्यामुळे पनवेल नगरपरिषदेने ही बससेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. पनवेल रेल्वे स्थानक, पनवेल बस स्थानक, नवीन पनवेल उड्डाणपूल, ठाणा नाका, कफनगर, सारस्वत बँक, तालुका पोलीस ठाणे, वाल्मीकी नगर, नगर पालिका, दर्गा नाका, लायन गार्डन, काळण समाज हॉल, प्रांत कार्यालय, गुरुपुष्प सोसायटी, साई रत्नदीप सोसायटी साईनगर आदी ठिकाणावर ही बस थांबणार आहे. पनवेल रेल्वे स्थानक ते साईनगर ही पहिली बसफेरी सकाळी ७.१८ मिनिटांनी तर शेवटची बस रात्री ८.३६ मिनिटांनी तसेच साईनगर ते पनवेल रेल्वे स्थानक पहिली बस सकाळी ७ वाजता व शेवटची बस ८.५६ मिनिटांनी सुटणार आहे. दर १५ ते १८ मिनिटांनी बस सुटेल. शहरात अनेक वर्षांपासून अशाप्रकारची परिवहन सेवा सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. ती आता पूर्ण झाली आहे. (प्रतिनिधी)