शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नव्या पुलाला शुभारंभापूर्वीच तडे

By admin | Updated: December 6, 2014 22:32 IST

घोडबंदरवरुन मुंबईकडे जाणा:या आणि सध्या खुल्या न झालेल्या एमएसआरडीसीच्या उड्डाणपुलावर काही ठिकाणी वाहतूक सुरु होण्यापूर्वीच तडे गेल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणो : घोडबंदरवरुन मुंबईकडे जाणा:या आणि सध्या खुल्या न झालेल्या एमएसआरडीसीच्या उड्डाणपुलावर काही ठिकाणी वाहतूक सुरु होण्यापूर्वीच तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. ते  भरुन काढण्यासाठी आणखी तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो अशी माहिती एमएसआरडीसीच्या सुत्रंनी दिल्याने मुंबईकडे जाणा:या वाहन चालकांना आता आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर ठेकेदाराच्या या निकृष्ट कामाबाबात ठाण्याचे रहिवासी असलेले राज्याचे नवनियुक्त सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे कोणती भूमिका घेतात, याकडे टेणींचे लक्ष लागले आह़े
मुंबईकडे जाणा:या 8क्क् मीटरच्या लेनसाठी मुख्यमंत्र्यांना पाचारण करण्यात येणार आहे. परंतु त्यांचा वेळ मिळत नसल्याने या पुलाचा शुभांरभ लाबंला आहे. प्रत्यक्षात यामध्ये काही ठिकाणचे काम शिल्लक असल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली होती. तसेच वाहतूक पोलिसांनी केलेल्या सुचनांनुसार काही ठिकाणी बदल करण्याचे काम सुरु होते. परंतु पुलाचे काम पूर्ण होऊनही पुलाचा शुभांरभ होत नसल्याने काही दिवसांपूर्वी कळवा - मुंब्य्राचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या पुलाचा शुंभारभ केला होता. त्यानंतर काही वेळ या पुलावरुन वाहतुक सुरु झाली होती. परंतु यामुळेच आता या पुलावर काही ठिकाणी तडे गेल्याची माहिती सुत्रंनी दिली. 
विशेष म्हणजे या पुलाच्या बांधणीसाठी तीन ते चार वर्षाचा कालावधी लोटला आहे. असे असतांना पुलाला तडे कसे गेले असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे. परंतु आता तडे गेल्याने या पुलाच्या दुरुस्तीसाठी आणखी तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो अशी माहिती एमएसआरडीसीच्या सुत्रंनी दिली आहे. ज्या ठिकाणी गर्डर टाकण्यात आला आहे, त्याच ठिकाणी तडे गेल्याचेही त्यांचे म्हणणो आहे, त्यामुळे तो बदलण्यात येणार असल्यानेच या पुलाचा मुहूर्त आणखी तीन ते चार महिने लांबणीवर पडणार आहे. 
या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, शुभारंभ केल्यानंतर माझीच गाडी त्यावरुन गेली होती. परंतु त्यानंतर हा पूल बंद केला होता. केवळ एमएसआरडीसी आणि ठेकेदाराच्या चुकीमुळेच हे तडे गेले असून या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)
 
पुलाला कोणत्याही प्रकारचे तडे गेलेले नाहीत. पुलामध्ये हायटेन्शन वायर टाकत असतांना त्याला असलेली प्रिसिव्हिंग केबल मध्येच तुटली आहे. त्यामुळे आता ती पुन्हा नव्याने टाकण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. 
- किशोर माळी, 
एमएसआरडीसी अधिकारी