शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

कमळावर उमटली ९ लाख मतांची मोहोर; धनुष्याला ७ लाख, तर मशालीला १ लाख ९८ हजारांची पसंती

By नामदेव मोरे | Updated: January 19, 2026 12:40 IST

नवी मुंबई महापालिका निवडणूक पहिल्यांदाच बहुसदस्यीय पद्धतीने झाली. २८ प्रभागांमधील १११ सदस्य निवडीसाठी ९ लाख ४८ हजार ४६० मतदारांची नोंदणी झाली होती.

- नामदेव मोरे

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. २८ प्रभागांमध्ये कमळावर ९ लाख ४० हजार मतांची मोहोर उमटली आहे. यानंतर ७लाख ४ हजार मते शिंदेसेनेच्या धुनष्यबाणाला मिळाली आहेत. उद्धवसेनेने १ लाख ९८ हजार मतांचा पल्ला गाठला असून, उर्वरीत एकही पक्षाला एक लाखाचा पल्ला गाठता आला नाही.

नवी मुंबई महापालिका निवडणूक पहिल्यांदाच बहुसदस्यीय पद्धतीने झाली. २८ प्रभागांमधील १११ सदस्य निवडीसाठी ९ लाख ४८ हजार ४६० मतदारांची नोंदणी झाली होती. ५७.१५ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. ५ लाख ४२ हजार ७४ नागरिकांनी मतदान केले. एक मतदाराला एका प्रभागात अ, ब, क, ड अशा चार पैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य होते. निवडणुकीमध्ये भाजपने सर्व १११ जागांवर उमेदवार उभे केले होते. मतदारांचा सर्वाधिक कौलही त्यांनाच मिळाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सर्व जागांवर मिळून ९ लाख ४ हजार ६६ वेळा कमळाचे बटण दाबले. शिंदेसेनेने १०६ उमेदवार उभे केले होते. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली. ७लाख ४ हजार ९४६ वेळा धनुष्यबाणाचे बटण दाबले आहे. तर मशालीला १ लाख ९८ हजार ३०५ वेळा पसंती मिळाली आहे.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप, शिंदेसेना यानंतर सर्वाधिक ८३ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. परंतु, अपक्षांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. एका प्रभागात अपक्ष विजयी झाला आहे. अपक्षांना ५२ हजार ९७४ मतांचा प्रतिसाद मिळाला आहे. मनसेने २५ जागा लढल्या असून, त्यांच्या रेल्वे इंजिनला ६३ हजार ६३७एवढी मते मिळाली आहेत. राष्ट्रबादीला (अजित पवार) २६ हजार २६ व राष्ट्रवादीला (शरद पवार) ५२ हजार ५०५ एवढी मते मिळाली आहेत. या व्यतिरिक्त इतर पक्षांना प्रतिसाद मिळाला नाही.

पक्ष / गटउमेदवार संख्यामिळालेली एकूण मते
भाजप-९,४०,०६६
शिवसेना (एकनाथ शिंदे)१०६७,०४,९४६
शिवसेना (उद्धव ठाकरे)५६१,९८,३०५
मनसे२५६३,६३७
राष्ट्रवादी (शरद पवार)८३५२,९७४
अपक्ष उमेदवार८३५२,५०५
राष्ट्रवादी (अजित पवार)२६२६,०९६
वंचित बहुजन आघाडी१८-
काँग्रेस-१५,६७८
आम आदमी पार्टी (AAP)१४३,२७८
जनता दल सेक्युलर२,४४७
समाजवादी पार्टी२,०५५
बहुजन समाज पक्ष (BSP)१,८४५
रिपब्लिकन सेना-१,७२३
आरपीआय (एठवले)१,२३५
BRSP६२४
राष्ट्रीय समाज पक्ष (RSP)--
PPAI (डे.कै.)--
English
हिंदी सारांश
Web Title : BJP wins Navi Mumbai election with landslide victory; Shiv Sena follows.

Web Summary : BJP secured a landslide victory in Navi Mumbai's municipal elections with 9.4 lakh votes. Shinde's Shiv Sena followed with 7 lakh, while Uddhav's group got 1.98 lakh votes. Other parties and independents trailed significantly.
टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाShiv Senaशिवसेना