शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

नेरूळमध्ये आजपासून नवी मुंबई उत्सव

By admin | Updated: December 23, 2016 03:30 IST

नेरूळ येथील आजपासून एफवायआय नवी मुंबई उत्सवाला प्रारंभ होत आहे. एनकोर इनोव्हॅटिव्ह मीडियाच्या माध्यमातून

नवी मुंबई : नेरूळ येथील आजपासून एफवायआय नवी मुंबई उत्सवाला प्रारंभ होत आहे. एनकोर इनोव्हॅटिव्ह मीडियाच्या माध्यमातून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी रंगतदार क्रिकेट सामने होणार आहेत. यात पोलीस, राजकारणी आणि शहरातील सेलिब्रेटींचे संघ सहभागी होणार आहेत. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.इव्हेंट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या एनकोर इनोव्हेटिव्ह मीडिया या संस्थेच्या वतीने शहरात प्रथमच अशाप्रकारचा उत्सव भरविण्यात आला आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी विविध संघात क्रिकेट सामने होणार आहेत. हे सामने दोन गटांत खेळविले जाणार आहेत. ‘अ’ गटातील एफवायआय सेलिबे्रटी आणि पोलीस पँथर यांच्यादरम्यान पहिला सामना होणार आहे. तर ‘ब’ गटातून राजकीय पुढाऱ्यांच्या संघाची लढत एफवायआय वॉरियर्सच्या संघाबरोबर होणार आहे. नवी मुंबईच्या इतिहासात प्रथमच राजकीय पुढाऱ्यांचा संघ क्रिकेटच्या मैदानात उतरणार असल्याने हे सामने पाहणे रोमांचकारी ठरणार आहे. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. एनकोअर इनोव्हेटिव्ह मीडियाचे प्रमुख गौतम आगा यांच्या कल्पकतेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नेरूळ येथील यशवंतराव चव्हाण मैदानावर २३ डिसेंबर रोजी सायंकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या उत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)