शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

फिफा स्पर्धेकरिता महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

By admin | Updated: July 17, 2017 01:29 IST

आंतरराष्ट्रीय फिफा वर्ल्ड कप स्पर्धा या पहिल्यांदा भारतात खेळल्या जाणार असून त्याकरिता नवी मुंबईतील नेरुळ येथील डी.वाय. पाटील

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : आंतरराष्ट्रीय फिफा वर्ल्ड कप स्पर्धा या पहिल्यांदा भारतात खेळल्या जाणार असून त्याकरिता नवी मुंबईतील नेरुळ येथील डी.वाय. पाटील क्रीडा संकुलाची निवड करण्यात आली आहे. विविध देशातील १७ वर्षांखालील फुटबॉल खेळाडू याठिकाणी येणार असून आॅक्टोबर महिन्यात या स्पर्धेला सुरुवात होत आहे. खेळाडूंच्या सरावासाठी महानगरपालिकेचे नेरूळ, सेक्टर १९ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण विशेष मैदान म्हणून तयार केले जात असून शनिवारी आयुक्तांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला.जगभरातून हे सामने बघण्यासाठी येणाऱ्या फुटबॉलप्रेमींचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असून महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी शहरातील प्रवेशाची ठिकाणे, मुख्य चौक, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, शहर अभियंता मोहन डगांवकर तसेच संबंधित विभागप्रमुख त्याचप्रमाणे डी.वाय.पाटील स्टेडियम, वाहतूक पोलीस विभाग, नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन,एम.जी.एम. रूग्णालय वाशी यांचे उच्च अधिकारी उपस्थित होते. २४ मेला या मैदानाला प्रत्यक्ष भेट देण्यात आली होती. अशाच प्रकारे सराव वाशी येथील एन.एम.एस.ए. मैदान तसेच डी.वाय.पाटील विद्यापीठ मैदान याठिकाणी सराव होणार असून त्याचीही माहिती आयुक्तांनी घेतली व महानगरपालिकेकडून स्पर्धेच्या कामाकरिता सहकार्य केले जाणार असल्याची सकारात्मक भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली. सराव मैदानांच्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाच्या ठिकाणी नेरूळ, वाशी, बेलापूर अग्निशमन केंद्रामार्फत अग्निशमन वाहने व अग्निशमन जवान तैनात असतील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.