शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विनानिविदा सुरू आहे महापालिकेचे कँटीन

By admin | Updated: August 31, 2015 03:28 IST

महापालिकेचे नवीन मुख्यालय सुरू होवून दीड वर्ष झाले तरी अद्याप कँटीनची निविदा काढलेली नाही. जुन्याच ठेकेदाराला हे काम दिले आहे.

नवी मुंबई : महापालिकेचे नवीन मुख्यालय सुरू होवून दीड वर्ष झाले तरी अद्याप कँटीनची निविदा काढलेली नाही. जुन्याच ठेकेदाराला हे काम दिले आहे. कँटीनमध्ये वस्तूंचे दरपत्रकही लावण्यात आलेले नसून, कर्मचारी अपुरे असल्यामुळे गर्दीच्या वेळी येथे येणाऱ्यांची गैरसोय होत आहे. नवी मुंबई महापालिकेने पामबीच रोडवर जवळपास २०० कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक मुख्यालय बांधले आहे. याठिकाणी कर्मचारी व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी विस्तीर्ण कँटीन तयार केले आहे. कर्मचारी, अधिकारी, नगरसेवक व नागरिकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे. कर्मचाऱ्यांना कार्यालयात जेवण किंवा अन्नपदार्थ खाण्यास परवानगी नाही. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना दुपारी जेवण करण्यासाठी किंवा चहा, नाष्टा करण्यासाठी कँटीनमध्येच यावे लागते. पालिकेत कामानिमित्त अनेक नागरिक येत असतात. येथे बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा असल्यामुळे अनेक नागरिक व्यावसायिक बैठकाही येथेच करू लागले आहेत. दुपारी जेवणाच्या वेळेला कँटीनमध्ये प्रचंड गर्दी असते. परंतु कँटीन चालविणाऱ्या ठेकेदाराकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे त्यांचा गोंधळ उडत आहे. नागरिकांना खाद्यपदार्थ घेण्यासाठी अर्धा ते एक तास वाट पहावी लागते. पालिकेने नवीन मुख्यालयामधील कँटीनसाठी अद्याप निविदा मागविल्या नाहीत. निविदा न मागविताच जुन्या मुख्यालयातील कँटीन चालकास ठेका दिला आहे. जुन्या मुख्यालयात कँटीनचा आकार लहान होता व तेथे जाणाऱ्यांची संख्याही कमी होती. परंतु नवीन मुख्यालयामध्ये सर्वांना कँटीनमध्येच जेवण करणे बंधनकारक आहे. यामुळे येथे दुपारी प्रचंड गर्दी होत असते. या ठेकेदाराने कोणत्या वस्तू मिळणार याचे दरपत्रकही लावलेले नाही. नागरिकांना वेळेत खाद्यपदार्थ मिळत नाहीत. सिडको, कोकण भवनच्या कँटीनच्या तुलनेमध्ये जेवणाचा दर्जाही चांगला राखला जात नाही. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होवू लागली आहे. (प्रतिनिधी)