शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव स्पर्धेत लोकमान्य सेवा मित्र मंडळ प्रथम

By admin | Updated: September 11, 2015 01:39 IST

महापालिकेने गतवर्षी आयोजित केलेल्या गणेश दर्शन स्पर्धेमध्ये ऐरोलीमधील लोकमान्य सेवा मित्र मंडळाचा पहिला क्रमांक आला आहे. सर्व विजेत्या मंडळांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

नवी मुंबई : महापालिकेने गतवर्षी आयोजित केलेल्या गणेश दर्शन स्पर्धेमध्ये ऐरोलीमधील लोकमान्य सेवा मित्र मंडळाचा पहिला क्रमांक आला आहे. सर्व विजेत्या मंडळांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. नवी मुंबई महापालिकेच्यावतीने प्रत्येक वर्षी गणेश दर्शन स्पर्धेचे आयोजन केले जाते. गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक संदेश देणारे देखावे. उत्सवांचे शांततेमध्ये आयोजन व इतर गोष्टींची पाहणी केली जाते. उत्तम आयोजन करणाऱ्या मंडळांचा सत्कार करण्यात येतो. गुरूवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात गतवर्षीच्या स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक ऐरोलीतील लोकमान्य सेवा मित्र मंडळ, द्वितीय क्रमांक नवयुग उत्सव मित्र मंडळ नेरूळ सेक्टर १०, तृतीय क्रमांक बजरंग तरूण मित्र मंडळ दिघा व उत्तेजनार्थ बक्षीस सानपाडाचा महाराजा सेक्टर १० व सीवूड दारावे मित्र मंडळाला देण्यात आला. माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. शहरातील ४३ खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. खेळाडूंना शिष्यवृत्तीचेही वितरण करण्यात आले. गणेश नाईक यांनी विजेत्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. खेळाडूंनी अजून चांगली कामगिरी करावी असे मत व्यक्त केले. यावेळी महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते. प्रथमच सर्व नेते एका व्यासपीठावर गणेश दर्शन स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त प्रथमच सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. गणेश नाईकांपासून दूर गेल्यानंतर विजय चौगुले प्रथमच त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होते. खासदार राजन विचारे, आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, एम. के. मढवी या सर्वांना शहरवासीयांनी प्रथमच एका व्यासपीठावर पाहिले. कार्यक्रमात दोन्ही आमदारांना भाषण करण्याची संधी दिली नाही. यामुळे मंदा म्हात्रे यांना डावलण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती.