विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे

By Admin | Updated: December 25, 2015 02:37 IST2015-12-25T02:37:36+5:302015-12-25T02:37:36+5:30

शहरातील विद्यार्थ्यांना पाचवीपासून स्पर्धा परीक्षांची माहिती मिळावी यासाठी सुभद्राआई बहुउद्देशीय संस्थेने शिवआधार सराव स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले होते.

Lessons for competitive exams for students | विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे

नवी मुंबई : शहरातील विद्यार्थ्यांना पाचवीपासून स्पर्धा परीक्षांची माहिती मिळावी यासाठी सुभद्राआई बहुउद्देशीय संस्थेने शिवआधार सराव स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले होते. शहरातील १८८४३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पाच गटांतील निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषिक देण्यात येणार आहे.
नवी मुंबई आधुनिक शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून देशभर ओळखले जात आहे. नर्सरीपासून वैद्यकिय महाविद्यालयापर्यंत अनेक शिक्षण संस्था येथे आहेत. परंतू शहरवासीयांना स्पर्धा परिक्षांविषयी आवड निर्माण करण्यासाठीची एकही चांगली संस्था नाही. महापालिकेच्या बेलापूरमधील ग्रंथालयातील अभ्यासिका सोडली तर विद्यार्थ्यांना अभ्यासाठी दुसरा पर्याय नाही. ऐरोली मतदार संघामध्ये काहीच सुविधा नाही. यामुळे नगरसेवक संजू वाडे यांनी मोफत मार्गदर्शन व सराव स्पर्धा परिक्षांचे आयोजन केले होते. जवळपास ६५ शाळांमध्ये मोफत मार्गदर्शन करून पाच गटामध्ये सराव परिक्षेचे आयोजन केले होते. तब्बल १९००३ विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. यामधील १८८४३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परिक्षा दिली. पहिल्या गटात स्वप्नाली शेलार, गायत्री शिरसाट, अस्मीता पाटील दुस-या गटामध्ये पुजा पिसाळ, ज्योती शेखावत, मितेश भोसले तिस-या गटात प्रिया झा, प्रतिक्षा पवार, तेजस काळे चौथ्या गटात प्रांजली नाईक, रोहीत यादव, सानिया सावंत पाचव्या गटात दिपेश झरेकर,वैष्णवी बिरादार, यशराज मानकुमरे प्रथम, द्वीतीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.
सर्व विजेत्यांना रोख पारितोषीक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी परिक्षेचे आयोजन केले जाणार असून तज्ञांकडून व शासकिय सेवेतील सनदी अधिकाऱ्यांकडून मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Lessons for competitive exams for students