शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शाळेलाही अखेरची घरघर

By admin | Updated: October 1, 2015 01:40 IST

कल्याण-डोंबिवली महापालिके च्या बहुतांश शाळांना पटसंख्येअभावी अखेरची घरघर लागली असताना त्यात आता पूर्वेकडील संत रोहिदास

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिके च्या बहुतांश शाळांना पटसंख्येअभावी अखेरची घरघर लागली असताना त्यात आता पूर्वेकडील संत रोहिदास प्राथमिक विद्यालयाचीदेखील भर पडली आहे. येथील घटती पटसंख्या पाहता ही शाळादेखील शेवटच्या घटका मोजत आहे.काटेमानिवली परिसरातील मराठी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. सद्य:स्थितीला येथील विद्यार्थी पटसंख्या अवघी ३८ इतकी आहे. इयत्तांच्या पटसंख्येनुसार पहिली आणि दुसरीत ३, तिसरीत २, चौथीत ७, पाचवीत ४, सहावीमध्ये ८ तर सातवीत ११ अशी विद्यार्थी संख्या आहे. या ठिकाणी बालवाडी असून येथील मुलांची संख्या १० आहे. २००८ च्या आसपास विद्यार्थी पट हा दीडशेच्या आसपास होता. सध्या तो ३८ वर येऊन ठेपला आहे. विद्यार्थी पटसंख्या किमान २० असणे बंधनकारक आहे. या शाळेतील पटसंख्या ३८ वर आल्याने शाळेला अखेरची घरघर लागल्याचे दिसत आहे. परंतु, यावर उपाय म्हणून शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणातून यंदा ८ ते १० विद्यार्थ्यांची वाढ झाल्याचा दावा येथील शिक्षक करीत आहेत. शाळेच्या एक किमी परिसरात अन्य दुसरी शाळा असू नये, असा नियम आहे. मात्र, या नियमाकडे येथेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. परिसरात ९ ते १० खाजगी शाळा असून याचा फटका पटसंख्येला बसला आहे. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही जण बहुभाषिक आहेत. शाळेची स्थापना १९४७ सालची असून नूतनीकरण २००९ मध्ये केले. वर्गखोल्या ६ आहेत. परंतु, येथे शिक्षक दोनच असल्याने इयत्ता पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी अशा इयत्ता एकत्रितपणे दोन खोल्यांमध्ये भरविल्या जात आहेत. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.