देहविक्रीसाठी अपहरण केलेल्या मुलीची सुटका

By Admin | Updated: January 5, 2016 02:08 IST2016-01-05T02:08:22+5:302016-01-05T02:08:22+5:30

देहविक्रीसाठी अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांनी सुटका केली आहे. तुर्भे येथे तिला डांबून ठेवल्यानंतर तिच्यावर बलात्कारदेखील झाला आहे.

Kidnapped girl for sex sale | देहविक्रीसाठी अपहरण केलेल्या मुलीची सुटका

देहविक्रीसाठी अपहरण केलेल्या मुलीची सुटका

नवी मुंबई : देहविक्रीसाठी अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांनी सुटका केली आहे. तुर्भे येथे तिला डांबून ठेवल्यानंतर तिच्यावर बलात्कारदेखील झाला आहे.
वाशी परिसरातून १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार वाशी पोलिसांकडे दाखल झाली होती. त्यानुसार सदर मुलीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षानेही मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. यादरम्यान हरवलेली मुलगी तुर्भे परिसरात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने परिसरात झडती घेतली. यावेळी आंबेडकर नगरमधील एका घरात डांबून ठेवलेल्या स्थितीत ही अल्पवयीन मुलगी आढळून आली.
त्यानुसार या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी जाकीया कुरेशी (२६) या महिलेला अटक करण्यात आली आहे. तिनेच सदर अल्पवयीन मुलीचे देहविक्रीसाठी अपहरण करून स्वत:च्या घरात डांबून ठेवले होते. पीडित अल्पवयीन मुलीसोबत असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन तिने त्या मुलीला वाशी गाव येथे भेटायला बोलावले होते. यानंतर घर दाखवण्याच्या बहाण्याने ती मुलीला घेऊन तुर्भे येथे आली होती. मात्र यानंतर तिला स्वत:च्या घरी न जाऊ देता डांबून ठेवले होते. जाकीया हिचा देहविक्री व्यवसायाशी संबंध असल्याने सदर मुलीलाही ती याच व्यवसायासाठी वापरणार होती. त्यानुसार जाकीया हिने ठरवलेल्या एका ग्राहकाने सदर अल्पवयीन मुलीवर बलात्कारदेखील केलेला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Kidnapped girl for sex sale