शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे नेरळ येथून अपहरण

By admin | Updated: September 22, 2015 03:46 IST

कशेळे ग्रामपंचायतीमधील कवठेवाडीतील वसंत पांडू कवठे यांची अल्पवयीन मुलगी नेरळ एसटी स्टॅण्ड येथून हरवली होती. तिला नेरळ जवळ असलेल्या ममदापुरवाडी मधील तरु णाने पळवून नेल्याची

नेरळ : कशेळे ग्रामपंचायतीमधील कवठेवाडीतील वसंत पांडू कवठे यांची अल्पवयीन मुलगी नेरळ एसटी स्टॅण्ड येथून हरवली होती. तिला नेरळ जवळ असलेल्या ममदापुरवाडी मधील तरु णाने पळवून नेल्याची तक्र ार नेरळ पोलीस ठाणे येथे दाखल झाली आहे.शनिवारी (१९ सप्टेंबर) सायंकाळी कशेळे ग्रामपंचायतमधील कवठेवाडीतील वसंत कवठे यांची मुलगी नेरळ येथे एसटी स्ॅटण्डवर घरी परत येण्यासाठी निघाली होती. त्यावेळी ममदापुरवाडी येथील दीपक अनंता निरगुडे याने दोन मित्रांच्या मदतीने त्या अल्पवयीन तरु णीला फूस लावून मिनीडोअर रिक्षामधून उतरवून तेथून नेले. मुलगी घरी आली नाही म्हणून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न रात्री सुरु केल्यानंतर मिनीडोअर रिक्षामध्ये बसलेली असतांना ममदापुरवाडीतील काही मुलांनी तिला उतरविले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वसंत कवठे हे कशेळे येथील काही लोकांसह नेरळ येथे मध्यरात्री पोहचले. त्यांनी प्रथम ममदापुरवाडी येथे जावून निरगुडे यांच्याकडे मुलीची चौकशी केली. मात्र तेथून कवठे यांना काहीही माहिती मिळाली नाही. शेवटी कवठे यांनी मध्यरात्री दिड वाजता नेरळ पोलीस स्टेशन गाठले. तेथे वसंत कवठे यांनी मुलीच्या अपहरण प्रकरणी दीपक निरगुडे याच्यावर तसेच त्याला मदत करणारे दशरथ निरगुडे आणि रु पेश चौधरी यांच्यावर तक्र ार नोंद केली. नेरळ पोलीस तपास करीत आहेत. निरगुडे आणि कवठे यांच्यात तडजोड झाल्यामुळे तरु णावर दंडात्मक कारवाई झाली नाही. (वार्ताहर)