शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोली सर्कलवरील रस्ते खड्ड्यांत

By admin | Updated: July 16, 2017 02:47 IST

वर्दळीचे जंक्शन असलेले कळंबोली सर्कल परिसर खड्ड्यांनी डॅमेज झाल्याने चालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे वाहतूककोंडी होतेच, तसेच लहान-मोठे अपघातही घडतात.

- लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : वर्दळीचे जंक्शन असलेले कळंबोली सर्कल परिसर खड्ड्यांनी डॅमेज झाल्याने चालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे वाहतूककोंडी होतेच, तसेच लहान-मोठे अपघातही घडतात. याबाबत संबंधित यंत्रणेकडून उपाययोजना होताना दिसत नाही. कळंबोली सर्कलला पनवेल-सायन, मुंबई-गोवा महामार्ग, जेएनपीटीकडे जाणारा महामार्ग हे जोडले जातात. द्रुतगती महामार्ग येथूनच सुरू होतो. एकंदर जंक्शन असल्याने येथे रात्रंदिवस वाहनांची वर्दळ सुरू असते. विशेष करून बाजूला लोह-पोलाद मार्केट असल्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहने येतात. जेएनपीटीलाही कळंबोली सर्कलवरूनच जावे लागते. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे सर्कलला मोठमोठे खड्डे पडले आहेत. पनवेल-सायन महामार्गावर कळंबोली वाहतूक शाखेसमोर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी त्यामध्ये साचत असल्याने वाहनचालकांना काहीच अंदाज येत नाही. त्यामुळे दररोज दुचाकी या खड्ड्यांत आदळतात. नवीन रस्ता करीत असताना पाण्याच्या निचरा करण्याकरिता चांगली उपाययोजना न झाल्याने, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. कळंबोली स्टील मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्याची फारशी चांगली स्थिती नाही. मुंब्रा महामार्गावर कळंबोली सर्कललगत खड्डे पडले आहेत. जेएनपीटीकडे जाणाऱ्या मार्गावर जंक्शनजवळ खड्डे आहेत. या रस्त्याची मालकी सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ, सिडको आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. त्यांच्यात समन्वय नसल्याने अशा प्रकारची स्थिती निर्माण होत आहे. कळंबोली वाहतूक विभागाच्या वतीने खड्ड्यांबाबत संबंधित विभागाला पत्र दिले असल्याचे कळंबोली वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी गोरख पाटील यांनी सांगितले.