शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्टस क्लबवरून युतीत जुंपली

By admin | Updated: September 14, 2015 03:54 IST

कल्याण स्पोटर््स क्लबचे उद्घाटन मंगळवारी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात येणार आहे. परंतु, तेथील काही कामे अर्धवट असून त्याचे उद्घाटन करण्याचा घाट का घातला आहे

अनिकेत घमंडी , डोंबिवलीकल्याण स्पोटर््स क्लबचे उद्घाटन मंगळवारी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात येणार आहे. परंतु, तेथील काही कामे अर्धवट असून त्याचे उद्घाटन करण्याचा घाट का घातला आहे, ते करण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी गोविंदवाडी बायपासच्या अर्धवट कामाची पूर्तता करायला हवी. मात्र, त्याकडे ते सोयीस्करपणे काणाडोळा करत आहेत. जे काम त्यांच्या खात्यांतर्गत येत आहे, त्याची पूर्तता करण्यावर भर द्या. मात्र, पालकमंत्री केवळ निवडणुकांच्या तोंडावर पक्षश्रेष्ठींसह या ठिकाणच्या नागरिकांची दिशाभूल करत असल्याची बोचरी टीका कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांनी केली. त्यांच्या या भूमिकेमुळे २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका हवी की नको, यावरून शिवसेना-भाजपात जुंपलेली असताना आता कल्याण स्पोटर््स क्लबमुळेही युतीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. यासंदर्भात पवार यांनी ‘लोकमत’जवळ पालकमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. जेव्हा, हे प्रोजेक्ट रखडलेले होते, त्या स्पोटर््स क्लबसंदर्भात त्यांच्या महापौरांनी ६० वर्षांचे कंत्राट देण्याचे ठरवले होते. परंतु, त्यात पवार यांनी स्वत: लक्ष घालत तेच कंत्राट २० वर्षांसाठी दिल्याचाही दावा त्यांनी केला. तेव्हा त्यांनी याबाबत लक्ष घातले नाही. केवळ उद्घाटनासाठी पालकमंत्री स्वत: शुक्रवारी त्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी गाड्यांच्या ताफयासह तेथे गेले होते. तेथे त्यांनी १५ ला ओपनिंग आहे, तयारी करा, असे सांगितले. मात्र, या सर्व भूमिकेत त्यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपाला कुठेही विचारातही घेतलेले नसल्याचे ते म्हणाले. पालकमंत्र्यांनी कल्याण-शीळ मार्गावरील रस्त्याची दुरवस्था याकडे का लक्ष दिलेले नाही. हे किती योग्य आहे, जे खाते त्यांच्याकडे आहे, त्याची कामे तरी केली आहेत का? असा सवाल पवार यांनी केला.