पत्रकार लोणे यांच्यावर हल्ला

By Admin | Updated: November 18, 2016 03:11 IST2016-11-18T03:11:45+5:302016-11-18T03:11:45+5:30

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भिवंडी तालुकाध्यक्ष सुनील लोणे यांच्यावर अनोळखी व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला.

Journalist Lonate attacked | पत्रकार लोणे यांच्यावर हल्ला

पत्रकार लोणे यांच्यावर हल्ला

अंबाडी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भिवंडी तालुकाध्यक्ष सुनील लोणे यांच्यावर अनोळखी व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पडघा पोलिसांनी पंकज पाटील, मनू पाटील या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. ते दुचाकीवरून घरी जात होते. त्याच वेळी दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांना बेदम मारहाण केली. लोणे यांची चेन व पैसे घेऊन पोबारा केला. त्यांना ठाणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Journalist Lonate attacked