शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या हेटवणे धरणातून दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: November 10, 2015 00:23 IST

सिडकोने बांधलेल्या हेटवणे धरणातून पेण तालुक्यातील ८४ गावांना तिन महिन्यांपापासून दुषीत पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात पुरवठा होणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा

दत्ता म्हात्रे ,  पेणसिडकोने बांधलेल्या हेटवणे धरणातून पेण तालुक्यातील ८४ गावांना तिन महिन्यांपापासून दुषीत पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात पुरवठा होणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा स्पष्ट अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. सर्व ग्रामपंचायतीने याविषयी तक्रारी करूनही व मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा केल्यानंतरही शासनाने अद्याप या समस्येचे दखल घेतलेली नसून या ६० हजार पेक्षा जास्त नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्यात पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे भिषण दुष्काळ पडला आहे. अनेक परिसरामध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. दिवाळीच्या अगोदरपासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणचे पाणी दुषीत असल्याचा अहवाल प्रयोगशाळांनी दिला असतानाही नागरिकांना पर्याय नसल्याने तेच पाणी प्यावे लागत आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामधील खारीपाट परिसरातील ८४ गावांना हेटवणे धरणातून पाणीपुरवठा होत आहे. याच या धरणातून पनवेल तालुक्यातील सिडको नोडमध्येही पाणीपुरवठा केला जात आहे. परंतू सिडकोने उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करून ते नागरिकांपर्यंत पोहचविले जात आहे. परंतू ज्या परिसरात हे धरण आहे तेथील नागरिकांना मात्र प्रक्रिया न केलेले दुषीत पाण्याचाच पुरवठा केला जात आहे. तिन महिन्यांपासून सुरू असलेल्या दुषीत पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पाण्याचे नमुणे ग्रामीण पाणीपुरवठा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेने हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा स्पष्ट अहवाल दिला आहे. खारेपाट परिसरात एकूण १२ ग्रामपंचायती आहेत. सर्व ग्रामपंचायती व तेथील सरपंचांनी या समस्येविषयी सिडको, संबंधीत विभाग व राज्य शासनाकडेही तक्रारी केल्या आहेत. दुषीत पाण्याच्या अहवालाच्या प्रतीही पाठविल्या आहेत. पंरतू एकही अस्थापनाने अद्याप याची दखल घेतलेली नाही. सिडकोने त्यांनी विकसीत केलेल्या नोडमधील नागरिकांसाठी जलशुद्धीकरण केंद्र बांधले आहे. परंतू ज्यांच्या जमीनीवर धरण बांधले त्या नागरिकांसाठी मात्र जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोर्टलवरही तक्रारी केल्या आहेत. परंतू मुख्यमंत्र्यांनीही या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे नाईलाजाने दुषीत पाणीच प्यावे लागत आहे. या पाण्याचा आरोग्यावर परिणाम होवू लागला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी पाणी उकळून पिण्यास सुरवात केली आहे. आहे.