शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई मेट्रोसाठी स्वतंत्र वीज व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:36 IST

बेलापूर ते पेंधर दरम्यान नवी मुंबई मेट्रो पुढील वर्षी धावणार असून, प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. सिग्नल, टेलिकम्युनिकेशन, रोलिंग आणि आॅटो फेअर ही कामे अंतिम टप्प्यात असून

अरुणकुमार मेहत्रे । कळंबोली : बेलापूर ते पेंधर दरम्यान नवी मुंबई मेट्रो पुढील वर्षी धावणार असून, प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. सिग्नल, टेलिकम्युनिकेशन, रोलिंग आणि आॅटो फेअर ही कामे अंतिम टप्प्यात असून, मेट्रोचे काही डबे चार महिन्यांपूर्वीच कारशेडमध्ये दाखल झाले आहेत. मेट्रोकरिता लागणाºया विजेची तरतूद करण्याचे काम महापारेषण कंपनीने हाती घेतले आहे. यासाठी खारघर सबस्टेशनमध्ये स्वतंत्र रोहित्र बसविण्याचे काम सुरू आहे.सिडकोने मे २०११मध्ये साडेचार हजार कोटी रु पये खर्चाच्या नवी मुंबई मेट्रोच्या कामाला सुरुवात केली. खरे तर हा प्रकल्प आतापर्यंत पूर्णत्वास येणे अपेक्षित होते; परंतु तांत्रिक अडचणींमुळे मेट्रो वेळेत धावली नाही. तळोजा पाचनंद येथील मेट्रोसाठी लागणाºया उड्डाणपुलाला मध्य रेल्वेकडून परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे गेली काही वर्षे कामाची गती मंदावली होती. सिडकोने आता या ठिकाणी पूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. मेट्रो मार्गाच्या खालून दिवा-पनवेल आणि मेल गाड्यांचा मार्ग आहे. हा उड्डाणपूल झाल्यानंतर जवळपास सर्व अडथळे दूर होणार आहेत.नवी मुंबई मेट्रो हा सिडकोचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एकूण ११ स्थानके या मार्गावर बांधण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर एका वेळी १४०० प्रवासी वाहतूक क्षमता असणार आहे, तसे नियोजन करण्यात आले आहे.तासी ८० कि.मी. नवी मुंबई मेट्रो धावणार असल्याने त्यानुसार यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. मेट्रोकरिता आवश्यक विजेसाठी महापारेषण कंपनीकडे प्रस्ताव आधीच सादर करण्यात आला असून, त्याकरिता लागणारा निधी सिडकोने उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार खारघर येथील महापारेषणच्या सबस्टेशनमध्ये ५० एमव्ही क्षमतेचे ट्रान्सफार्मर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ४००/२२० के. व्ही. क्षमता असणाºया या सबस्टेशनमधून ९४५ एमव्ही वीज पुरवली जाते. येथे आधीच दोन ट्रान्सफार्मर आहेत. आता आणखी ५० एमएव्हीचा ट्रान्सफार्मर बसविण्यात येणार आहे. लवकरच हे काम पूर्णत्वास येणार आहे. येथून मेट्रो रेल्वेकरिता वीज दिली जाणारआहे. याशिवाय आगामी काळात सिडकोचे जे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहतील, त्यांनाही येथूनच वीज दिली जाणार आहे.