रेल्वेत धूम्रपानाच्या प्रमाणात वाढ

By Admin | Updated: February 12, 2015 01:12 IST2015-02-12T01:12:30+5:302015-02-12T01:12:30+5:30

रेल्वेतून प्रवास करताना धूम्रपान करण्यास मनाई असतानाही झुरके बहाद्दरांचा बिनदिक्कतपणे प्रवास सुरू असल्याचे समोर आले आहे

Increase in the quantity of smoking in the railway | रेल्वेत धूम्रपानाच्या प्रमाणात वाढ

रेल्वेत धूम्रपानाच्या प्रमाणात वाढ

मुंबई : रेल्वेतून प्रवास करताना धूम्रपान करण्यास मनाई असतानाही झुरके बहाद्दरांचा बिनदिक्कतपणे प्रवास सुरू असल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वेमार्गावर २0१४ मध्ये तब्बल २१९ झुरके बहाद्दरांना पकडण्यात आले असून, त्याआधीच्या वर्षाशी तुलना करता ही आकडेवारी खूपच वाढली असल्याचे रेल्वे पोलीस सांगतात.
रेल्वेतून प्रवास करताना ज्वलनशील पदार्थ नेण्यास तसेच धूम्रपान करण्यास मनाई असल्याचे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये तसेच उपनगरीय लोकलमध्ये एका फलकावर नमूद केलेले असते. तरीही याकडे अनेक प्रवासी कानाडोळा करतात आणि बिनदिक्कतपणे धूम्रपान करताता. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील शौचालयांमध्ये तर उपनगरीय लोकलमधील मालडब्यांमध्ये धूम्रपान करण्याचे प्रकार सर्रासपणे घडतात.
रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून धूम्रपान अधिक प्रमाणात केले जात असल्याचे रेल्वे पोलीस सांगतात. याची एखाद्या प्रवाशाकडून पुढाकार घेऊन तक्रार केली जाते आणि त्यावर त्वरित कारवाईही होते.
२0१३ मध्ये ६४ प्रवाशांवर धूम्रपान केल्याविरोधात रेल्वे पोलीस अ‍ॅक्ट १६७ नुसार कारवाई करण्यात आली आहे. मात्र २0१४ मध्ये कारवाईचा आकडा पाहिला असता तो अधिकच वाढल्याचे समोर आले आहे. तब्बल २१९ प्रवाशांवर
धूम्रपान केल्याची कारवाई
करण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. त्यांच्यावर
केलेल्या दंडात्मक कारवाईतून २५ हजार २५0 दंड वसूल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Increase in the quantity of smoking in the railway