शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

रुंदीकरणात झोपड्यांचा अडथळा

By admin | Updated: November 10, 2015 00:22 IST

महामार्ग रुंदीकरणाकरिता कळंबोली सर्कल ते पळस्पे फाटा दरम्यान अतिक्रमणांना रस्ते विकास महामंडळाने नोटिसा बजावल्या आहेत

पनवेल : महामार्ग रुंदीकरणाकरिता कळंबोली सर्कल ते पळस्पे फाटा दरम्यान अतिक्रमणांना रस्ते विकास महामंडळाने नोटिसा बजावल्या आहेत. मात्र पनवेल शहरातील महामार्गालगत ज्या व्यावसायिकांनी झोपडीवजा दुकाने थाटली आहेत, त्यांनी या कारवाईला विरोध दर्शवला आहे. आधी पुनर्वसन करा... मगच कारवाई करा... अशी भूमिका झोपडपट्टी रहिवासी संघाने घेतली आहे. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाला महामार्ग रुंदीकरणात अडचणी येण्याची शक्यता आहे. पनवेल पालिका आणि सिडकोहद्दीत असलेल्या झोपड्यांमुळे काही प्रकल्प आणि विकासकामात अडथळा निर्माण होत आहे. तत्कालीन नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या काळात ‘झोपडपट्टीमुक्त पनवेल’ हा संकल्प मांडण्यात आला. प्रशांत ठाकूर नगराध्यक्ष असताना त्यांनी शहरातील झोपड्यांचा बायोमेट्रिक सर्व्हे करून पुनर्वसनासाठी पाठपुरावा सुरू ठेवला. मात्र सिडकोकडून भूखंड न मिळाल्याने आजतागायत पुनर्वसन झाले नाही.मोक्याच्या जागेवर असलेल्या झोपड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक कारणासाठी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. पनवेल बसस्थानकाजवळील झोपड्यांमध्ये ट्रॅव्हल्सवाल्यांची दुकाने गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. तसेच या ठिकाणी खाद्यपदार्थ, गॅरेज, मोबाइल यासारखी दुकाने सुरू आहेत. रुंदीकरणासाठी रस्ते विकास महामंडळाने येथील झोपडीधारकांना नोटिसा बजावल्या होत्या, मात्र त्यास विरोध दर्शवण्यात आला आहे. आम्ही गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून आहोत. त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीकरिता पत्रव्यवहार केले आहेत. हा अर्ज चौकशीकरिता तहसीलदारांकडे वर्ग केला होता. त्यानुसार तहसीलदारांनी सर्वेक्षण करून या जागेवर राहण्याकरिता परवानगी देण्यास हरकत नसल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केल्याचे निवेदन झोपडपट्टीवासीयांनी दिले आहे.